Pune Crime News | नशा करण्यासाठी घरफोडी करणारे दोघे जेरबंद; चोरीचा अजब फंडा, 8 मोबाईलसह पावणेदोन लाखांचा माल जप्त

पुणे : Pune Crime News | दुचाकीची चोरी करुन त्यावरुन फिरुन घरफोडी करायची, त्यानंतर ती दुचाकी पुन्हा त्याच जागी लावायची अशी युक्ती करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या (Pune Police Crime Branch) पथकाने पकडले. त्यांच्याकडून ८ मोबाईल, दुचाकी असा १ लाख ८५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. नशा करण्यासाठी ते घरफोडी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune Crime News)

युवराज सिंग गुरुबच्चन कल्याणी (रा. रामटेकडी, हडपसर) असे त्याचे नाव असून त्याचा साथीदार अल्पवयीन आहे.

लष्कर परिसरात एक घरफोडीचा गुन्हा बुधवारी दाखल करण्यात आला होता. त्याचा समांतर तपास युनिट २ चे पथक करत होते. त्या परिसरातील ३५ सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेले संशयित धोबीघाट येथे असल्याची माहिती पोलीस अंमलदार कादिर शेख व समीर पटेल यांच्या बातमीदारांनी दिली. त्यावरुन पोलिसांनी तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये ८ मोबाईल व चोरीची दुचाकी मिळाली. (Pune Crime News)

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी कॅम्प परिसरातील हॉटेल व ज्युस सेंटरची शटर उचकटून लॉक तोडून त्यातील ८ मोबाईल चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून लष्कर पोलीस ठाण्यातील (Lashkar Police Station) २ आणि स्वारगेट (Swargate Police Station) व वानवडी पोलीस ठाण्यातील (Wanwadi Police Station) प्रत्येकी एक असे ४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokle),
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार
(ACP Sunil Pawar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील (Sr PI Krantikumar Patil)
यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भोसले (API Bhosale), पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे
(PSI Nitin Kamble), राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार , शंकर नेवसे, संजय जाधव, गजानन सोनुने,
साधना ताम्हाणे , कादिर शेख, समीर पटेल, निखील जाधव, मोहसीन शेख, उत्तम तारू, प्रमोद कोकणे,
विनोद चव्हाण, पुष्पेंद्र चव्हाण, राजापुरे, नागनाथ राख या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | Two drug burglars jailed; Strange fund of theft, goods worth 2 lakhs seized along with 8 mobile phones

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satish Kaushik Passes Away | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

Aurangabad ACB Trap | 50 हजार रुपये लाच घेताना भविष्य निर्वाह कार्यालयातील वेतन अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात