Pune Crime News | तरुणाला धमकावून लुटणारे दोघे जेरबंद; पोलिसांनी चोरट्यांना पकडल्यानंतर प्रकार उघडकीस

पुणे : Pune Crime News | रात्रीच्या वेळी गप्पा मारत थांबले असताना दोघांनी तरुणाला धमकावून लुबाडले. पण, त्याने पोलिसांकडे तक्रारच केली नाही. पोलिसांना या चोरट्यांविषयी माहिती मिळाल्यावर त्यांनी चोरट्यांना पकडले. त्यावरुन पोलिसांनी फिर्यादीचा शोध घेतला. (Pune Crime News)

याबाबत वाघोली येथील एका २६ वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ९२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर सुनिल सांगडे (वय २३) आणि अमित प्रकाश इंगोले (वय १९, रा. पठारे मळा, खराडी) यांना अटक केली आहे. हा प्रकार नगर रोडवरील हॉटेल मराठा दरबार समोर २८ जानेवारी रोजी पावणेबारा वाजता घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र हॉटेल मराठा दरबारसमोर रात्री गप्पा मारत होते. त्यावेळी दोघे जण आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला धमकावले. फिर्यादीच्या खिशातील ३० हजार रुपयांचा मोबाईल व २ हजार रुपयांचे मनगटी घड्याळ जबरदस्तीने काढून घेतले. त्यांनी ते परत मागितल्यावर त्याने मोबाईल व घड्याळ विसरुन जा आणि पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. (Pune Crime News)

विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त घालत असताना दोघा जणांनी लुबाडल्याची माहिती मिळाली.
त्यावरुन पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडील मोबाईलवरुन फिर्यादीचा शोध घेतला.
त्यानंतर त्याने फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक ढावारे तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | Two jailed for threatening and robbing a young man; After the police caught the thieves, the case was revealed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagpur Crime News | एका शुल्लक कारणावरून पतीने केली पत्नीची हत्या मग स्वतःदेखील केली आत्महत्या; नागपूरमधील घटना

Mumbai Crime News | धक्कादायक ! पनवेलमध्ये लेकीसोबत बापानेच केले दुष्कर्म; मुलीच्या पोटात दुखू लागल्याने झाले उघड

Pune Crime News | मुलींच्या वसतीगृहात जाण्यास मनाई केल्याने टोळक्याने दांडक्याने केली मारहाण

Aurangabad Crime News | नववधूने लग्नाच्या 6 दिवसांनंतर सासरच्या माणसाच्या हातावर तुरी देत केले पलायन; औरंगाबादमधील घटना

Samantha Ruth Prabhu | अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ला समांथा रुथ प्रभूचा नकार; समोर आले खरे कारण