Pune Crime News | हडपसरमध्ये दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील दोघांना अटक, पाबळमधील उसाच्या रानात पाठलाग करुन ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हपसर परिसरात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या व दरोडा (Robbery), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) पथकाने अटक (Arrest) केली आहे. शिरुर तालुक्यातील पाबळमधील एका शेतात आरोपींचा पाठलाग करुन पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. (Pune Crime News) तर कोयता गँगमधील (Pune Koyta Gang) आणखी एकाला नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातून अटक केली आहे.

कोयता गँगचा म्होरक्या स्वप्नील उर्फ बिट्या संजय कुचेकर (वय-22 रा. मांजरी, हडपसर), पंकज गोरख वाघमारे (वय-28 रा. बंटर स्कूलजवळ, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 3 जानेवारी रोजी घडलेल्या दरोडा व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कोयता गँगमधील कुचेकर आणि वाघमारे हे दोघे फरार होते. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. (Pune Crime News)

कोयता गँग मधील दोन जण शिरूर तालुक्यातील पाबळ गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस कर्मचारी निखिल पवार, समीर पांडुळे, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ
हे पाबळ येथे गेले. पोलिसांना पाहताच आरोपींनी उसाच्या शेतात पळून गेले.
पोलिसांनी आरोपींचा उसाच्या शेतात पाठलाग करुन पकडले.
यापूर्वी गुन्हे शाखा युनिट सहाने (Crime Branch Unit 6) याच टोळीतील तीन जणांना अटक केली आहे.
दरम्यान, आणखी एका आरोपीला नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून सत्यम भोसले याला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.

Web Title :- Pune Crime News | Two of the Koyta gang who terrorized Hadapsar were arrested, chased and chained to the sugarcane forest in Pabal.

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime News | मुंबईतील आयआयटीमध्ये 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Bigg Boss 16 Grand Finale | पुण्याच्या एमसी स्टॅन बनला ‘बिग बॉस 16’ च्या पर्वाचा विजेता

Beed Crime News | दुर्देवी ! विजेचा धक्का लागल्याने 18 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू