Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणाऱ्या दोन अट्टल वाहनचोरांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक (Anti-Robbery and Vehicle Theft Squad) दोनने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून दोन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई नायगाव फाटा येथे केली. (Pune Crime News)

नाना उर्फ मल्हारी बाबुराव पोळे Nana alias Malhari Baburao Pole (वय-27 रा.आष्टा ता.लोहारा जि.धाराशिव), कार्तिक प्रकाश भुजबळ Karthik Prakash Bhujbal (वय-26 रा. लोणी काळभोर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) दाखल असलेले दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे अधिकारी व कर्मचारी हे हडपसर (Hadapsar Police Station) आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शिवाजी जाधव आणि उदय काळभोर यांना माहिती मिळाली की, नायगाव फाटा येथील अल्फा पेट्रोल पंपजवळ दोन इसम वाहनचोरीतील 2 दुचाकी वाहने विक्री करणार आहेत. त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्या ठिकाणी जावून खात्री करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांबाबत विचारणा केली असता त्यांनी त्या दुचाकी लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरल्याचे कबूल केले. आरोपींकडून 70 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी जप्त करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Pune Crime News)

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokle),
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतिश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड (Senior PI Nand Kumar Gaikwad),
पोलीस अंमलदार उदय काळभोर (Police Officer Uday Kalbhor),
राजेश अभंगे, सुदेश सपकाळ, शिवाजी जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज