Pune Crime News | दोन सराईत वाहनचोरांना समर्थ पोलिसांकडून अटक, रिक्षासह दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात रिक्षा आणि दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत वाहन चोरांना समर्थ पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन रिक्षासह एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी ही कारवाई मंगळवार पेठ येथे केली. (Pune Crime News)

आलीम अल्ताफ पालकर Aleem Altaf Palkar (वय-26 रा. आलीम टॉवर जवळ, कोंढवा), अक्तर हसन शेख Akhtar Hasan Shaikh (वय24 रा. ग्रीन पार्क, कोंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) 13 सप्टेंबर रोजी एमएच 12 एफसी 1658 क्रमांकाची बजाज ऑटो रिक्षा चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार हेमंत पेरणे (Police Constable Hemant Perne), शरद घोरपडे व रोहीदास वाघेरे यांनी तब्बल 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. दरम्यान हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार हेमंत पेरणे व रहीम शेख यांना माहिती मिळाली की, चोरीची एमएच 12 एफसी 1658 क्रमांकाची रिक्षा बाणेर रोड, मंगळवार पेठ येथे असून त्यामध्ये दोन जण बसले आहेत. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रिक्षाच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपींना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केले. त्यावेळी आरोपींनी एमएच 12 एफसी 1658 क्रमांकाची रिक्षा न्यु नाना पेठ येथून चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक तपासात आरोपींनी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एमएच 12 एफसी 0398 ऑटोरिक्षा व एमएच 12 जेई 2200 दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन ऑटोरिक्षा आणि एक दुचाकी जप्त केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील (IPS Pravin Patil),
पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल्ल (DCP Sandeep Singh Gill),
सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे (Senior PI Suresh Shinde),
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे (PI Pramod Waghmare)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे (PSI Sunil Ranadive),
सौरभ थोरवे, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, शरद घोरपडे, रहीम शेख, रोहीदास वाघेरे, प्रमोद जगताप,
गणेश वायकर, शहाजी केकान, दत्तात्रय भोसले, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | बारामती-मोरगाव रस्त्यावर दुचाकीचा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

Total
0
Shares
Related Posts