Pune Crime News | पैसे मागितल्याने दोघा गुंडाचा पाणीपुरी चालकावर चाकू हल्ला

पुणे : Pune Crime News | पाणी पुरी खाल्ल्यानंतर पैसे मागितल्याने दोघा गुंडाने पाणीपुरी चालकावर चाकूने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारवाड्यासमोरील पाणीपुरी स्टॉलवर (Panipuri Stall) शनिवारी रात्री पावणे आठ वाजता घडला. (Pune Crime News)

 

याप्रकरणी राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा शिवाजी रोडवर शनिवारवाड्यासमोर पाणीपुरीचा स्टॉल आहे. शनिवारी रात्री रिक्षातून दोघे जण अचानक आले. त्यांनी फिर्यादी यांना पाणी पुरी खिला, तू अपने भाई को बुला असे म्हणाले. फिर्यादी यांनी त्यांना पाणीपुरी खाण्यास दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यास पाणीपुरीचे पैसे मागितले असता त्यांचा राग येऊन त्यांनी खिशातून चाकू काढला.
फिर्यादी यांच्या कोपर्‍यावर व दंडावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. दुसर्‍याने त्यांना हाताने मारहाण केली.
सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Two thugs attacked Panipuri driver with knife for demanding money

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा