Pune Crime News | पुण्यात भीषण अपघातात आई-मुलाचा मृत्यू, महिलेचं सरपंच होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बेल्हा-जेजुरी मार्गावर (Belha-Jejuri Route) शुक्रवारी (दि.3) रात्री झालेल्या भीषण अपघातात (Terrible Accident) मायलेकरासह अन्य एका तरुणाचा मृत्यू (Death) झाला. हा अपघात रात्री सातच्या सुमारास झाला. अपघातात मृत्यू झालेले दोन तरुण लहानपणापासूनचे जीवलग मित्र होते. तरुण मुलांच्या अपघाती मृत्यूने मित्र परिवारावर शोककळा (Pune Crime News) पसरली आहे.

संकेत दिलीप डोके (Sanket Dilip Doke), विजया दिलीप डोके (Vijaya Dilip Doke), ओंकार चंद्रकांत सुक्रे (Omkar Chandrakant Sukre) असे मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. विजया डोके या आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीच्या (Khadakwadi Gram Panchayat) विद्यमान सदस्या होत्या आणि त्या लवकरच सरपंच (Sarpanch) होणार होत्या. या ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्याने विजया डोके या सरपंच होणार होत्या. मुलगा आणि आईचा एकाचवेळी अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Pune Crime News)

अपघातात मृत्यू झालेले संकेत आणि ओंकार हे लहानपणापासून जिवलग मित्र होते.
पूजेच्या कार्यक्रमासाठी सर्वजण जात होते.
धामारी येथील खंडोबा मंदिराच्या जवळील वळणावर शिक्रापूरच्या बाजूने आलेल्या टेम्पोची
(एम एच 14 जी. यू 6880) डोके यांच्या दुचाकीला धडक बसली.
या भीषण अपघातात गंभीर जखमी होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title :- Pune Crime News | two wheeler and eicher tempo accident on belhe jejuri highway 3 dead

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dipa Karmakar | भारताच्या ‘या’ महिला जिम्नॅस्टपटूचे 21 महिन्यांसाठी निलंबन; उत्तेजक द्रव्य चाचणीत आढळली दोषी

Nagpur ACB Trap on PSI | आरोपीला अटक न करण्यासाठी 35 हजार रुपये लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात