Pune Crime News | फ्लॅट भाडयाने घेण्याच्या बहाण्याने सायबर भामटयांनी 50 हजारांना फसवलं

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुण्यात सायबर गुन्हेगार (Cyber criminals) जास्तच ऍक्टिव्ह असल्याचे दिसत असून, वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून पुणेकरांच्या पैशांवर डल्ला मारत (pune crime news) आहेत. फ्लॅट भाड्याने घ्यायचा असल्याचे सांगत एकाची फसवणूक (Fraud) केली असताना आता आणखी एक प्रकार समोर आला  आहे. 50 हजार रुपयांची फसवणूक (Fraud of Rs 50,000) केली आहे. pune crime news | Under the pretext of renting a flat, cyber hackers cheat Rs 50,000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याप्रकरणी सुबोध नंदकुमार लोणकर (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञातावर विश्रांतवाडी पोलीस (Vishrantwadi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धानोरीत राहतात. फिर्यादी यांच्या वडिलांचा कळस गावठाण येथे एक फ्लॅट आहे. तो फ्लॅट भाड्याने द्यायचा होता.
तसेच फिर्यादीच्या आई नंदा लोणकर यांनी 99 एकर्स या वेबसाईटवर याबाबत नोंद केली होती.
यादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन केला. तसेच, लष्करात नोकरीस आहे.
मला तुमचा फ्लॅट आवडला असून, फ्लॅट भाड्याने घेण्यास इच्छुक आहे.
त्याचे फोटो पाठवण्यास सांगितले. तसेच तुमचे दरमहा भाडे व डिपॉझिट मान्य असून, ते पैसे गुगल पे करतो असे सांगून फिर्यादी यांना सुरुवातीला स्वतःच्य गुगल पे अकाउंट वर एक रुपया ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
त्यांनी आईकडे फोन पे नसल्याने त्यांच्या स्वतःच्या मोबाइलवरून 1 रुपया ट्रान्स्फर केला.
त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून 25 हजार रुपयांचे दोन ट्रांजेक्शन करत परस्पर 50 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली आहे.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे या करत आहेत.

Web Title : pune crime news | Under the pretext of renting a flat, cyber hackers cheat Rs 50,000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Thane Crime Branch Police | ठाण्यात 39 लाखांचे नेपाळी हिरव्या रंगाचे चरस जप्त, 3 जणांना अटक