woman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

पुणे /पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन  –  येथील नाशिक फाटा पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला (woman dead body found  in pune) आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृत महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी फुरसुंगी परिसरात कालव्यात दोन मृतदेह वाहून आले होते. यामध्ये पुरुष आणि महिलेचा मृतदेह (woman dead body)  काही मिनिटाच्या अंतरातच वाहून आले होते. हि घटना ताजी असतानाच आता आणखी एका महिलेचा मृतदेह आढळल्याने (woman dead body found in pune) एकच खळबळ उडाली असून पोलिसांसमोर तापाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी  सांगितलेल्या माहितीनुसार मृत महिलेने अंगात काळ्या रंगाचा स्वेटर घातला होता तिचा रंग गोरा आहे.
तिच्याबाबत कोणाला काही माहिती असेल तर तत्काळ सांगवी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मृतदेह मिळाल्यापासून पोलिसांनी विविध संशय व्यक्त करून त्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे.
अद्यापपर्यंत ठोस अशी काही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही.
परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही धागेदोरे हाती लागताहेत कि नाही याचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title : pune crime news | unknown woman dead body found under bridge in pune sensation in area on suspicion of murder

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

three dead body in pune | पुण्यात वेगवेगळ्या भागातील कॅनॉलमध्ये आढळले 3 मृतदेह