Pune Crime News | २४ वर्षाच्या मुलावर लादली अवास्तव बंधने; आईवडिलांना सांगण्याच्या धमकीने लुबाडले अडीच लाख

पुणे : Pune Crime News | आपल्या मुलाने कोणाशी मैत्री करु नये, मुला मुलींशी बोलू नये, अशी अवास्तव कडक शिस्त त्यांनी आपल्या मुलावर लादली होती. त्यातून मुलीबरोबरील नाही तर मुलाबरोबरील व्हॉटसअ‍ॅपवर झालेले चॅट (WhatsApp Chat) आई वडिलांना दाखवितो, अशी धमकी एका २४ वर्षाच्या तरुणाला देऊन त्यांच्याकडून तब्बल अडीच लाख रुपये लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी एरंडवणा येथे राहणार्‍या एका ४८ वर्षाच्या व्यावसायिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६३/२३) दिली आहे. त्यानुसार, प्रितेश सोंडकर नावाचा तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मार्केटयार्डात घाऊक व्यापार आहे. त्यांना एक २४ वर्षाचा मुलगा असून त्याने बी बीए पूर्ण केले असून तो एका ठिकाणी काम करतो. त्यांना गर्लफ्रेंड (Girlfriend), बॉयफ्रेंड (Boyfriend) असला प्रकार आवडत नाही. त्याला त्यांचा विरोध असून त्यातूनच त्यांनी मुलावर मोठी बंधने घातली आहेत. त्यांना मार्च महिन्यात वार्षिक टॅक्स भरावयाचा असल्याने त्यांनी स्वत:चे व कुटुंबियांचे खात्यात झालेल्या व्यवहाराची माहिती घेतली. त्यात त्यांच्या महाविद्यालयीन मुलाच्या खात्यातून गुगल पे द्वारे १ लाख ५२ हजार रुपये व प्रत्येकी २५ हजार असे चार वेगवेगळ्या क्रमांकावर ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मुलाला विचारले. त्याने जे सांगितले, तेव्हा आपल्या बंधनामुळे मुलगा किती दडपणाखाली वागत होता आणि त्या पोटी त्याने कोणाला न सांगता तब्बल अडीच लाख रुपये घाबरुन दिल्याचे उघड झाले. (Pune Crime News)

फिर्यादी यांच्या मुलाला ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रितेश सोंडकर नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती.
त्याने ती स्वीकारल्यावर त्याला स्रेहल गुरव नावाने मेसेज येऊ लागले.
त्याने प्रितेश सोंडकर नावाची फेसबुकवरील रिक्वेस्ट माझीच असून मी तुझा व्हॉटसअ‍ॅप नंबर वरुन घेतला असून आपण मित्र म्हणून बोलू असे त्याने सांगितले.
व्हॉटसअ‍ॅपवर चॅट सुरु झाल्यानंतर त्यांच्या मुलाने त्याला भेटण्याविषयी विचारले.
तेव्हा त्याने मी फुकट भेटत नाही, त्यासाठी १ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
मुलाने १ हजार रुपये पाठवले. त्यानंतर त्याने आतापर्यंत केलेले चॅट तुझ्या आईवडिल व फेसबुक फ्रेंडना पाठवतो,
असे म्हणून धमकावु लागला. पैशांची मागणी करु लागला.
आपल्या वडिलांना मित्र वगैरे आवडत नसल्याचे मुलाला माहिती असल्याने त्याने भितीपोटी घरी कळु नये,
म्हणून तो मुलगा सांगेल, तसे पैसे देत गेला. त्याने एकूण १ लाख ५२ हजार रुपये पाठविले होते.
त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी त्याला पुन्हा मेसेज आला. आता शेवटचे १ लाख रुपये दे. मी पुन्हा तुला त्रास देणार नाही,
असे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या भाचाच्या दुकानात काम करणार्‍या चौघांच्या नावावर प्रत्येकी
२५ हजार रुपये पाठविले. ते पैसे त्याने सांगितलेल्या नंबरवर पाठविण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांनी मुलाच्या मोबाईलवरील तो नंबर बंद केला.
त्यानंतर त्याने दुकानातील लोकांना त्याला पैसे पाठविण्यास सांगितले होते. त्यांना मेसेज येऊ लागले.
फिर्यादीच्या मुलाला मला फोन करायला सांगा नाही तर त्याचे वडिलांना फोन करेल, असे सांगून धमकावत आहे.

डेक्कन पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Unreasonable restraints imposed on a 24-year-old; Two and a half lakhs were looted by threatening to tell parents

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Borghat Accident News | बोरघाटात बस दरीत कोसळली ! खोपोलीतील घटनेत 8 जणांचा मृत्यु, 32 जण जखमी

Radhakrishna Vikhe-Patil | ‘आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये’, विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर