Pune Crime News | Food Delivery App चा अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी वापर; 5 जणांना अटक, 53 लाखांचे ‘एलएसडी स्टॅम्प’ (Drugs) जप्त

पुणे : Pune Crime News | शहरातील रस्त्यावरुन आपल्याला फुडची डिलिव्हरी (Food Delivery App) रात्रीअपरात्री करण्यासाठी जाताना दिसतात. फुड डिलिव्हरी करत असल्याने त्यांच्याकडे कोणी संशयानेही पहात नाही. याचाच गैरफायदा घेऊन एका टोळक्याने अंमली पदार्थाची (Drugs) विक्री करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत त्याचे पार्सल पोहचविण्यासाठी चक्क डनजो ऑनलाईन डिलिव्हरी अ‍ॅपचा (Dunzo Delivery App) वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell Pune) पाच जणांना अटक केली आहे. (Pune Crime News)

रोहन दीपक गवई Rohan Deepak Gavai (वय २४, रा. डि पी रोड, कर्वे पुतळा, कोथरुड), सुशांत काशिनाथ गायकवाड Sushant Kashinath Gaikwad (वय ३६, रा. बाणेर, मुळ कोडोली, सातारा – Satara), धिरज दिपक लालवाणी Dhiraj Deepak Lalvani (वय २४, रा. पिंपळे सौदागर), दीपक लक्ष्मण गेहलोत Deepak Laxman Gehlot (वय २५, रा. सनसिटी रोड – SunCity Road Pune), ओंकार रमेश पाटील Omkar Ramesh Patil (वय २५, रा.वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५१ लाख ६० हजार रुपयांचे १७ ग्रॅमचे १०३२ तुकडे, इतर ऐवज असा ५३ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस अंमलदार विशाल शिंदे (Police Vishal Shinde) यांना कोथरुड व परिसरात डनजो ऑनलाईन डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे एल एस डी Lysergic acid diethylamide (LSD) या अंमली पदाथार्ची खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रोहन गवई याला पकडून त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचे एल एस डी जप्त केले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याचे इतर साथीदारही असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्य चौघांना बाणेर (Baner), सिंहगड रोड (Sinhagad Road), पिंपळे सौदागर (Pimple Saudagar), वाकड (Wakad) परिसरातून अटक केली. (Pune Crime News)

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत गवई हा एमबीएच्या शेवटच्या वर्षात (MBA Final Year) शिकत आहे.
गायकवाड हा अभियंता असून त्यांचे इतर साथीदारही उच्च शिक्षित आहेत.
पार्ट्यांचा नाद आणि शौक पुरविण्यासाठी पैसा मिळविण्यासाठी त्यांनी हा अंमली पदार्थ विक्रीचा धंदा सुरु केला.
धीरज, दीपक आणि ओंकार हे तिघे यातील मास्टर माईंड असून इतर पेडलर आहेत.
व्हॉटस अ‍ॅपद्वारे संपर्क (WhatsApp) साधल्यानंतर डिलिव्हरी देण्यासाठी ते फुड अ‍ॅपद्वारे ऑर्डर बुक करत असत.
त्यानंतर समोरील व्यक्तीने ऑर्डर दिल्यानंतर ते डिलिव्हरी बॉयकडे पार्सल पॅक करुन देत असत.
या पार्सलमध्ये काय आहे, हे डिलिव्हरी बॉयला माहिती नसायचे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale)
सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर (API Shailaja Jankar), पोलिस अंमलदार विशाल शिंदे,
पोलिस मनोजकुमार साळुंके, पोलिस मारुती पारधी, पोलिस पांडुरंग पवार, पोलिस सुजित वाडेकर,
पोलिस विशाल दळवी, पोलिस संदीप शिर्के, पोलिस राहुल जोशी, पोलिस नितेश जाधव यांच्या पथकाने केली.

Web Title :  Pune Crime News | Use of Food Delivery App for drug sales; 5 people arrested, ‘LSD Stamp’ (Drugs) worth 53 lakhs seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News |  ‘एकनाथ शिंदे गारुडी तर देवेंद्र फडणवीस…’, सापनाथ-नागनाथ टीकेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

ACB Demand Case | देशी दारूची विक्री करता अशी विचारणा करून दर महिन्याला एक केस व मासिक हप्ता? पोलिसावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

New Education Policy | पुढील वर्षी दहावी- बारावी बोर्डाची परीक्षा होणार का नाही?, याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्षांचे स्पष्टीकरण