Pune Crime News | पंजा तोडल्याच्या रागातून कोंढव्यात जाऊन केली वाहनांची तोडफोड; १४ वाहनांचे केले नुकसान, तिघांना अटक

पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलांबरोबर ८ जणांनी लाडप्पा याच्यावर कोयत्याने वार करुन त्याच्या हाताचा पंजा तोडल्याचे समजल्यावर त्यांच्या मित्रांनी कोंढव्यात जाऊन त्याच रात्री राडा घातला. टिळेकरनगर येथील पार्क केलेल्या चारचाकी, दुचाकी, टेम्पो, रिक्षा अशा १४ वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) तिघांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

ऋषिकेश शंकर गोरे Rishikesh Shankar Gore (वय २०, रा. केदारेश्वर वस्ती, गोकुळनगर, कोंढवा), सुशिल दादा दळवी Sushil Dada Dalvi (वय २०, रा. गोकुळनगर, विद्याविहार सोसायटी, कोंढवा), प्रविण शिवाजी भोसले Pravin Shivaji Bhosale (वय १८, रा. गोकुळनगर, कोंढवा – Kondhwa News)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत संजीवकुमार हनमंत धनी Sanjeev Kumar Hanmant Dhani (वय ४९, रा. टिळेकरनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३१०/२३)दिली आहे. हा प्रकार टिळेकरनगरमध्ये २२ मार्च रोजी रात्री पावणेअकरा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात लाडप्पा याच्यावर टोळक्याने हल्ला करुन
त्यांच्या खूनाचा प्रयत्न केला होता. त्यात त्याच्या हाताचा पंजा तुटला.
हल्लेखोरांपैकी काही जण गोकुळनगर, टिळेकरनगर परिसरात राहत असल्याची माहिती लाडप्पा याच्या साथीदारांना मिळाली.
त्यानंतर बुधवारी रात्री हे ४ दुचाकी गाड्यांवरील १० ते १२ जण हातात तलवारी, कोयते घेऊन आले.
फिर्यादी यांची डस्टर गाडी तसेच वेंगनार गाडीच्या काचा फोडून नुकसान केले.
तसेच गल्लीतील ६ चारचाकी, ३ दुचाकी, ३ टेम्पो, १ रिक्षा, १ छोटा हत्ती अशा इतर १४ गाड्यांच्या काचा
फोडून नुकसान केले. परिसरात दहशत निर्माण केली. काल दिवसभरात कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली
असून सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Vandalized vehicles by going to Kondhwa out of anger at having his paw broken; 14 vehicles damaged, three arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna Crime News | जमिनीच्या वादातून आरोपीकडून सावत्र भावाची हत्या; जालन्यामधील घटना

Pradeep Sarkar Pass Away | दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे अल्पशा आजाराने निधन