Pune Crime News | शनिवारवाडा परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या जोडप्याला विश्रामबाग पोलिसांकडून अटक, पाच गुन्हे उगडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील शनिवारवाडा परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या एका जोडप्याला विश्राबाग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून वेगवेगळ्या कंपन्यांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई (Pune Crime News) शनिवारवाडा परिसरात करण्यात आली.

विकी दादा गायकवाड (वय-26) आणि एक तरुणी (वय-22 दोघे रा. सांगवी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शनिवारवाडा (Shaniwar Wada) पाहण्यासाठी आलेल्या एकाची पार्किंगमधून दुचाकी चोरी झाली होती. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) 10 फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)

पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार खरात व पाटील यांना एक जोडपे संशयीतरित्या दुचाकी गडीची पाहणी करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी शनिवारवाडा परिसरातून पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या दुचाकी त्यांच्या मुळ गावी लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी सातारा येथे जाऊन वेगवेगळ्या कंपन्यांच्या चार मोटार सायकल आणि एक मोपेड जप्त करुन विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पाच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे
(Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 संदिप सिंह गिल्ल
(DCP Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने (Senior Police Inspector Sunil Mane),
पोलीस निरीक्षक गुन्हे दादा गायकवाड (Police Inspector Dada Gaikwad), पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे
(PSI Rakesh Sarde), मनोज बरुरे (PSI Manoj Barure)पोलीस अंमलदार अशोक माने, हेमंत पालांडे,
हर्षल दुडुम, मयुर भोसले, प्रकाश बोरुटे, सागर गोंजारी, आशिष खरात, राहुल मोरे, अर्जुन थोरात,
साताप्पा पाटील यांच्या पथकाने केली.

Web Title :-Pune Crime News | Vishram Bagh police arrested a couple who stole a bike from Shaniwarwada area, five crimes were registered

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | निवडणूक हरण्याच्या भीतीपोटी भाजप लोकशाहीचा गळा घोटत आहे – रवींद्र धंगेकर

Parbhani Accident News | दुर्दैवी ! रुग्णालयात जाताना आजोबा आणि नातवाचा भरधाव बसच्या टायरखाली चिरडून मृत्यू

Pune Crime News | खराडीत जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 16 जणांवर कारवाई