Pune Crime News | अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या सराईताला विश्रामबाग पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या सराईताला विश्रामबाग पोलिसांनी Vishrambag Police अटक केली आहे. पुरंदर Purandar तालुक्यातील नीरा येथून त्याला पकडले आहे. अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली आहे. गेले दोन महिन्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. Pune Crime News

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

अभिषेक विकास रानवडे Abhishek Vikas Ranwade (वय 29, रा.620 नारायण पेठ) असे अटक Arrest केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. अभिषेक (दि.24 एप्रिल) याने 24 एप्रिलला अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. यानंतर तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याच दरम्यान, मुलीचा शोध लागत नसल्याचा चिंतेतून मुलीचे वडील अस्वस्थ होते. यातच त्यांना ह्रदयविकाराचा Heart disease झटका आला आणि त्यांचे निधन झाले होते. मुलीचा शोध पोलीस घेत नसल्याचे नातेवाईकांनी म्हंटले होते.

Pune News | ‘कोरोना’चा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले…(व्हिडीओ)

यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या पथक तयार करून या आरोपीचा शोध सुरू केला होता.
नर्हे, Narhe सिंहगड, चाकण, सांगली, Sangli सातारा भागात गेल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार शोध सुरू होता. यादरम्यान रानवडे मुलीबरोबर बारामतीत असल्याची माहिती उपनिरीक्षक राकेश सरडे, बाबा दांगडे, प्रशांत शिंदे यांना मिळाली.
त्यानंतर पथकाने बारामती गाठले.
पण, पोलीस आले असल्याचे समजताच रानवडे मुलीला घेऊन पुरंदर Purandar तालुक्यातील नीरा Nira परिसरात गेला.
पोलीस मागावर जात त्यांनी सापळा लावून त्याला पकडले.
त्याच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका केली.

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त प्रियंका नारनवरे,
सहाय्यक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय टिकोळे,
गुन्हे शाखेचे निरीक्षक कुंडलीक कायगुडे, उपनिरीक्षक राकेश सरडे, खानविलकर, पूनम पाटील, संजय दगडे, बाबा दांगडे, प्रशांत शिंदे यांनी केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Pune Crime News Vishrambag police arrested criminal for kidnapping a minor girl

हे देखील वाचा

Dog instructor | राज्यातील पहिल्या महिला डॉग इन्स्ट्रक्टर सुप्रिया किंद्रे यांचा सत्कार

PM Narendra Modi । पीएम मोदींनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कलम 370 नंतर आता कोणता निर्णय ?