Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विश्रामबाग पोलिस स्टेशन – भाड्याने लॅपटॉप घेऊन 40 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भाड्याने लॅपटॉप (Laptop On Rent In Pune) घेऊन त्याचे दोन वर्षांचे भाडे न देता, २४ लॅपटॉप परत न करता तब्बल ३९ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी पंकज लक्ष्मीनारायण करवा (वय ४३, रा. सिंहगड रोड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११४/२३) दिली आहे. त्यानुसार अभिजीत खोत, अमोल जाधव, अमर पवार, अक्षय सिन्नरकर यांच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २०१७ पासून घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कारवा यांची बालाजी कॉम्युटर या नावाची कंपनी
(Balaji Commuter Company) आहे. ते जुने नवीन संगणक विक्रीचा व्यवसाय करतात.
त्यांनी अभिजित खोत याच्या वॉर्डवीज इंडिया सोल्युशन कंपनीस (Wardwiz India Solution Pvt Ltd)
संगणक पुरविण्याचे काम करत असते. फिर्यादी यांनी आरोपींना वेळोवेळी २४ लॅपटॉप भाड्याने पुरविले होते.
त्याचे प्रति महा १ लाख ८४ हजार ८० रुपये भाडे ठरले होते. मात्र, त्यांनी २ वर्ष भाडे दिले नाही.
दोन वर्षात त्याचे ४४ लाख ७५ हजार ६८१ रुपये भाडे झाले. फिर्यादी यांनी पोलीस आयुक्तांकडे (CP Pune) तक्रार केल्यावर आरोपीनी तडजोड करीत ३९ लाख ४५ हजार रुपये देण्याचे मान्य केले. तसेच १८ लॅपटॉप व एक डेस्कटॉप सर्व्हर परत दिला. ६ लॅपटॉप स्वत:कडे ठेवले. तसेच त्यांनी दिलेला धनादेश शिल्लक नसल्याने परत गेला. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सरडे (PSI Sarde) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Vishrambaug Police Station – 40 lakh fraud by renting a laptop

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Omraje Nimbalkar | खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न, पण…

CBI Raid On IAS Dr. Anil Ramod | राज्य शासनाच्या अखत्यारितील अधिकार्‍यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कारवाई करते पण ‘या’ प्रकरणात सीबीआयने कशी कारवाई केली?; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात पुढील पाच दिवस उष्णता; 16 जूनपर्यंत मान्सूनची करावी लागणार प्रतीक्षा