Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विश्रामबाग पोलिस स्टेशन – शनिवार पेठेत झोपण्यावरुन झालेल्या वादात एकाला दिले पेटवून; मुठेश्वर मंदिराजवळील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | झोपण्यावरुन झालेल्या वादात एकाने दुसर्‍याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून त्याला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

मिलिंद सिद्धपा होसकुटी Milind Siddhapa Hoskuti (वय३८, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी – Khadki) हे भाजले आहेत. विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) बालमुकुंद पंडीत (वय ५९, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे. हा प्रकार शनिवार पेठेतील मुठेश्वर मंदिराच्या (Mutheshwar Temple Shaniwar Peth) वर असलेल्या वाचनालयात सोमवारी मध्यरात्री पाऊण वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते फिरस्ते आहेत.
फिर्यादी यांना रविवारी रात्री घरी जाण्यास उशीर झाल्याने ते मुठेश्वर मंदिरात झोपण्यासाठी आले होते.
त्या ठिकाणी झोपण्यावरुन त्यांचा पंडित याच्याशी वाद झाला.
तेव्हा पंडितने त्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
तेव्हा फिर्यादी हे बाजूला असलेल्या वाचनालयात जाऊन झोपले.
ते झोपेत असताना पंडित याने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला आग लावून दिली.
त्यात त्यांच्या छातीला व हाताला भाजले आहे. शेजारील बॅनरही जळून गेला.
पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पंडित याला अटक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ (API Nikumbh) तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Vishrambaug Police Station – Shaniwar Peth One was set on fire in an argument over sleeping; Incident near Mutheshwar Temple

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagesh Bhonsle | चिडियाखाना : अभिनेते नागेश भोसले बनले मुंबईचे महापौर

Naresh Mhaske | ‘संजय राऊत म्हणजे सिल्व्हर ओकच्या दारातील…’, नरेश म्हस्केंचा राऊतांवर घणाघात

Majhi Vasundhara Abhiyan 3.0 Awards | जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधऱा 3.0 पुरस्कारांचे वितरण; सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात पुण्याचे कलेक्टर डॉ. राजेश देशमुख