पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका वडापाव विक्रेत्याला (Vadapav Seller) मारहाण करुन डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. ही घटना हडपसर येथील रविदर्शन चौकात (Ravidarshan Chowk Hadapsar) 25 जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी (Pune Crime News) एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जखमी वैजनाथ प्रकाश भिसे Vaijnath Prakash Bhise (वय-19 रा. दांगट वस्ती, साडेसतरा नळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) सोमवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. तर नितीन पवार Nitin Pawar (रा. डावरी वस्ती, हडपसर) याच्यावर आयपीसी 323, 324, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी वैजनाथ भिसे यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी हे वडापावची गाडी बंद करुन जात होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा आरोपी नितीन पवार हा त्याठिकाणी आला. त्याने जुन्या भांडणाच्या (Dispute) कारणावरुन फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण (Beating) केली. तसेच त्याठिकाणी पडलेला दगड उचलून वैजनाथ भिसे याच्या डोक्यात घालून गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस हवालदार गव्हाणे (Police Constable Gavane) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Wadapav vendor beaten up due to old dispute, incident in Hadapsar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पूलाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात;
अपघातात पत्नी ठार तर पती जखमी - Keshav Upadhye | ‘वाझे ते खैरे हा महाविकास आघाडीचा खंडणीवसूलीचा प्रवास..;’
भाजप नेते केशव उपाध्ये यांची महाविकास आघाडीवर टीका - Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांची भली मोठी यादी; काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढणार