Pune Crime News | वाघोली: नवरा बायकोच्या भांडणात पडणे बेतले होते जीवावर; मध्यस्थी करणार्‍याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसर्‍याने पडू नये, असे म्हणतात. पण, एकाने त्यात नाक खुपसले. त्यामुळे रागावलेल्या नवर्‍याने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

याबाबत नेत्रकुमार परदेस निषाद (वय ३७, रा. केसनंद फाटा, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७९३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुरली जेठुराम निषाद Murli Jethuram Nishad (वय ३३, रा़ केसनंद फाटा, वाघोली) याला अटक केली आहे. हा प्रकार केसनंदफाटा येथील संत तुकाराम नगरमधील बुरुडे यांच्या बांधकामाच्या ठिकाणी शनिवारी सकाळी साडेसात वाजता घडला.

या घटनेत तुळशीराम (वय ४०) हा गंभीर जखमी झाला असून अद्याप बेशुद्ध असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे मुळचे छत्तीसगड येथील राहणारे आहेत.
ते बुरुडे यांच्या बांधकामाच्या ठिकाणी बिगारी काम करतात. तेथेच पार्किंगमध्ये राहत आहेत. तुळशीराम हाही तेथेच रहातो. मुरली निषाद व त्याच्या बायकोमध्ये सकाळी भांडणे सुरु होती. यामध्ये तुळशीराम पडला. याचा मुरली याला राग आल्याने तेथेच पडलेला लोखंडी रॉड घेऊन त्याने तुळशीराम याच्या डोक्यात घातला. त्यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन तुळशीराम हा बेशुद्ध पडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक राजगरु तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Srinivas Patil | शरद पवार हे नास्तिक नाहीत, खासदार श्रीनिवास पाटलांकडून आरोपांचं खंडन

Pune-Daund Railway Block | तांत्रिक कामांसाठी पुणे-दौंड मार्गावर रेल्वेचा ब्लॉक, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांचे सूचक विधान, म्हणाले-‘राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे ते…’