Pune Crime News | वाकड: येथे दारु पिऊ नका म्हटल्याने व्यावसायिकाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | गोडावूनजवळ भर दिवसा दारु पित बसलेल्यांना येथे दारु पिऊ नका असे म्हटल्याने टोळक्याने कोयत्याने व्यावसायिकाच्या डोक्यात वार करुन लोखंडी रॉडने मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. हा व्यावसायिक खिडकीतून उडी मारुन पळून गेल्याने आपला जीव वाचवू शकला. (Pune Crime News)

या घटनेत शाहजाद मो. शफिक अन्सारी (वय ४०, रा. वाकड) हे गंभीर जखमी झाले असून थेरगाव येथी न्यू थेरगाव हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याबाबत वाकड पोलिसांनी (Pune Police) मंगेश कस्पटे, अभिषेक कस्पटे, जयेश कस्पटे, दत्ता पाटील, बालवडकर, पवन तसेच तिघे अनोळखी यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार थेरगाव येथील मानका चौकाजवळील इन होम फर्निचर (In Home Furniture) दुकानाजवळ रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फर्निचर व्यवसाय आहे. त्यांनी अभिषेक कस्पटे याच्याकडून भाड्याने गोडावून घेतले आहे. तेथे ते फर्निचर बनविण्याचे काम करीत असून ७ कामगार ठेवले आहे. ते नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी गोडावूनकडे जात होते. त्यावेळी वाटेत गोडावूनच्या समोर कच्च्या रस्त्यावर कार लावून मंगेश कस्पटे, जयेश कस्पटे, व त्याचे मित्र दारु पित बसले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना येथे दारु पिऊ नका, असे बोलले. त्यावेळी मंगेश कस्पटे याने त्यांना आडवून तू मला येथे दारु पिऊ नको, असे बोलणारा कोण आहेत, असे बोलून त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. हा प्रकार त्यांच्या कामगारांनी पाहिला. परंतु, त्यांनी हात करुन त्यांना इकडे येऊ नका असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी मोटारसायकलवरुन गोडावूनमध्ये आले.

काम करत असताना काही वेळाने मंगेश कस्पटे, जयेश, अभिषेक व त्यांचे काही साथीदार हातात कोयते, लाकडी दांडके,
लोखंडी रॉड घेऊन त्यांच्या गोडावूनमध्ये आले. त्यावेळी जयेश कस्पटे म्हणाला की,
तुला माहिती नाही काय आम्ही गाववाले आहोत, तू आम्हा गाववाल्याचा नादाला लागलास काय आज तुला सोडत नाही,
तुझी विकेटच टाकतो. त्यावर मंगेश कस्पटे याने सर्वांना बोलला की याचा मर्डर टाका, याला सोडू नका, असे म्हणून
त्याने समोरुन फिर्यादीच्या डोक्यात वार केला. दुसरा वार करणार तेवढ्यात फिर्यादी यांनी डावा हात मध्ये घातल्याने मनगटावर जबर दुखापत झाली. इतरांनी हातातील लाकडी दांडके, लोखंडी रॉडने फिर्यादी यांना मारहाण करण्यास
सुरुवात केली. त्यांचे कामगार सोडविण्यासाठी येत असताना त्यांनाही मारहाण केली.
त्यात फिर्यादी यांनी स्वत:ची सुटका करुन घेत खिडकीतून उडी मारुन पळून जात स्वत:चा जीव वाचविला.
सध्या त्यांच्यावर न्यू थेरगाव हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. हॉस्पिटलमधून दिलेल्या फिर्यादीवरुन
पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Srinivas Patil | शरद पवार हे नास्तिक नाहीत, खासदार श्रीनिवास पाटलांकडून आरोपांचं खंडन

Pune-Daund Railway Block | तांत्रिक कामांसाठी पुणे-दौंड मार्गावर रेल्वेचा ब्लॉक, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांचे सूचक विधान, म्हणाले-‘राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे ते…’