Pune Crime News | वानवडी : टेम्पो न दिल्याने अल्पवयीन मुलावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | कामासाठी टेम्पो न दिल्याच्या कारणावरुन टोळक्याने १७ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

याप्रकरणी समीना मतीन शेख (वय ४०, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४७१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार रामटेकडी येथील बाराममी अ‍ॅग्रो चिकन सेंटरसमोर सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांना २४ सप्टेंबर रोजी टेम्पो न दिल्याने त्यांच्यात वाद झाल होता. फिर्यादी यांचा मुलगा मुज्जमीन (वय १७) व त्याचा मित्र विवेक राखपसरे (वय १४) हे सोमवारी सायंकाळी पायी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडविले. मुज्जमीन याच्या डोक्यावर, मानेवर, पायावर, मांडीवर धारदार हत्याराने व लोखंडी रॉडने वार केले. तसेच सिमेंटच्या तुकड्याने मारुन गंभीर जखमी केले. मुज्जमीन याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गावडे (PSI Gawde) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khadakwasla To Phursungi Water Tunnel | खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्या
ऐवजी बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजनेत एक पाउल पुढे;
प्रकल्प राबविल्यास मुठा उजव्या कालव्यावर २७ कि.मी.
पर्यायी रस्ता तयार होणार !

26 September Rashifal : कन्या आणि तुळसह या चार राशीच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये होईल वाढ, वाचा दैनिक भविष्य