Pune Crime News | Wanawadi Police Station : पुणे – वानवडी पोलिसांकडून घरफोडी करणार्‍या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलातील वानवडी पोलिसांनी (Wanawadi Police Station) घरफोडी (Gharpohdi) करणार्‍या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 38 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

अभिषेक सुभाष जाधव Abhishek Subhash Jadhav (21, रा. सर्व्हे नं. 81, चिमटा वस्ती, वानवडी) आणि मयुर महेंद्र मोरे Mayur Mahendra More (21) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 10 मे 2023 रोजी वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी झाली होती. त्यामध्ये 2 लाख 88 हजार रूपयाचा ऐवज लंपास करण्यात आला होता. वानवडी पोलिस स्टेशनमधील तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हे चोरटयांचा शोध घेत असताना त्यांना आरोपींबाबत माहिती समजली. (Pune Crime News)

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. साक्षीदारांनी दुजोरा दिल्यानंतर आणि आरोपींनी कबुली दिल्यानंतर वानवडी पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपींकडून 36 ग्रॅम वजनाचे सोने आणि 150 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पाय पटया, मनगटी घडयाळ असा एकुण 2 लाख 38 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Patil), सहाय्यक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pournima Taware) यांच्या
मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Sr PI Bhausaheb Pathare), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदिप शिवले (PI Sandeep Shivle), पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे (PSI Santosh Sonavane), पोलिस अंमलदार अतुल गायकवाड, पोलिस अमजद पठाण, पोलिस संतोष नाईक, पोलिस महेश गाढवे, पोलिस संदिप साळवे, पोलिस विष्णु सुतार, पोलिस राहुल गोसावी, पोलिस निलकंठ राठोड, पोलिस अमोल गायकवाड, पोलिस विठ्ठल चोरमले, महिला पोलिस मनिषा सुतार आणि महिला पोलिस सोनम भगत यांनी ही कारवाई केली आहे.

Web Title :  Pune Crime News | Wanawadi Police Station: Pune – Wanawadi police arrested two burglars

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी? शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप; म्हणाले- ‘शिंदे गटाच्या खासदारांना भाजपकडून सापत्न…’

Pune Metro Structural Audit | पुणे मेट्रो स्थानके आहेत पूर्णपणे सुरक्षित; सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा अहवाल

Deepak Kesarkar | मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? दीपक केसरकर यांनी स्पष्टचं सांगितले