Pune Crime News | मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वानवडी पोलिसांकडुन अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करुन त्याला अटक (Arrest) करण्यात वानवडी पोलिसांना (Pune Police) यश आले आहे. अनिल हौशिलाल चव्हाण (वय-22 सध्या रा. येरवडा मुळ रा. जवळा बाजार, ता. औंढा जि. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर यापूर्वी अनेक पोलीस ठाण्यात घरफोडी (Burglary) व मंदिरातील दानपेटी चोरीचे गुन्हे (Pune Crime News ) दाखल आहेत.

 

चोरीच्या गुन्ह्यांचा प्रतिबंधक करण्यासाठी वानवडी पोलीस ठाण्यातील (Wanwadi Police Station) तपास पथक घोरपडी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी सोपानबाग येथे आरोपी हातात स्टीलची दानपेटी घेऊन उभा असल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांना संशय आल्याने त्यांनी आरोपीला हटकले असता, पोलिसांना पाहून तो दानपेटीसह पळत सुटला. पोलिसांनी फिल्मस्टाईल त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. (Pune Crime News)

 

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने घोरपडीतील लक्ष्मी माता मंदिरातून दानपेटी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक तुटलेली दान पेटी, 500 रुपये रोख आणि एक सीसीटीव्ही कॅमेरा जप्त करण्यात आला. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी समर्थ (Samarth Police Station), कुर्डुवाडी (Kurduwadi Police Station), कल्याण पोलीस ठाण्यात (Kalyan Police Station) घरफोडी व मंदिरातील दानपेटी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pournima Taware)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Senior Police Inspector Bhausaheb Pathare),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप शिवले (Police Inspector Sandeep Shivle),
पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले (PSI Ajay Bhosle), पोलीस अंमलदार राजु रासगे, विनोद भंडलकर,
महेश गाढवे, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Wanwadi police arrested the inn criminal who stole the donation box from the temple

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rani Mukerji | राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर पाहताच क्षणी अंगावर येईल काटा

Shiv Thakare | मराठी चित्रपट न करण्याबद्दल शिव ठाकरेचे वक्त्यव्य; म्हणाला – ‘काही चित्रपटांसाठी माझी निवड…’

Pune Kasba Peth Bypoll Election | धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय होणार – मोहन जोशी