Pune Crime News | Whatsapp Chatting, Video Call करून लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ दाखवुन ज्येष्ठाला नग्न होण्यास पाडलं भाग, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले साडेचार लाख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ज्येष्ठ नागरिकाशी व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग (Whatsapp Chatting) आणि व्हिडीओ कॉल (Whatsapp Video Call) करून त्यांच्या लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ दाखविला. त्यांना नग्न होण्यास भाग पाडलं आणि नंतर व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले. रेकॉर्ड केलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 4 लाख 66 हजार रूपये घेवुन फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरूध्द चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

यासंदर्भात गोखलेनगर (मॉडेल कॉलनी) परिसरात राहणार्‍या 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 21 मार्च ते दि. 25 मार्च दरम्यान फिर्यादी हे घरी असताना आरोपींनी वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरून त्यांच्याशी व्हॉट्सअ‍ॅपव्दारे संपर्क साधला. त्यांच्याशी चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल करून त्यांच्या लैंगिक भावना उत्तेजित होतील असा व्हिडीओ दाखविला आणि त्यांना नग्न होण्यास भाग पाडले. ते लग्न झालेल्या व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले आणि नंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. (Pune Crime News)

तर काही आरोपींनी पोलिस असल्याची बतावणी करून सदरील व्हिडीओ युटयुबवरून डिलीट करण्याचे चार्जेस म्हणून त्यांच्याकडून
एकुण 4 लाख 66 हजार रूपये आयडीबीआय बँकेत भरण्यास भाग पाडले.
फिर्यादीने प्रथम शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात (Cyber Police Station Pune) याबाबत अर्ज केला होता.
चौकशीवरून आरोपींविरूध्द चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman) करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Whatsapp Chatting, Video Calling, showing a sexually stimulating video, forcing a senior to get naked, threatening to make the video viral, four and a half lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | राम नवमीच्या दिवशी उद्धव ठकरेंचा शिंदे गटाला टोला, म्हणाले-‘सध्या राजकारणात श्रीरामाचे नाव घेऊन दगड…’

Nandurbar Police | नंदुरबार पोलीस दलाच्या ‘अक्षता समिती’ने थांबविला बालविवाह

Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी