Pune Crime News | आमच्या गल्लीत का आलास असे म्हणून गुंडाने डोक्यात फोडली बिअरची बाटली

पुणे : Pune Crime News | पान टपरीवर पानमसाला खाण्यासाठी गेलेल्या एक युवकाला आमच्या गल्लीत का आलास असे म्हणून गुंडाने डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले. (Pune Crime News)

याप्रकरणी किशोर पात्रे (वय १९, रा. ताडीवाला रोड) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०७/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजय (हॅलो) लक्ष्मण कांबळे Ajay Laxman Kamble (वय १९, रा. ताडीवाला रोड) याला अटक केली. काश्या कांबळे, सोनु परमार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री पावणेदहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पान टपरीवर पानमसाला खाण्यासाठी गेले होते.
त्यावेळी तेथे अजय कांबळे व इतर आले. “तू भाजी मंडईत राहत असून इकडे आमच्या गल्लीमध्ये का आलास,
” असे म्हणून फिर्यादी यांना हाताने, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक कोळेकर तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Why did you come to our street, the goon smashed a beer bottle on his head

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलीस असल्याचे सांगून तिघा चोरट्यांनी नेले अमेरिकन डॉलर चोरुन; गांजा बाळगल्याचे सांगत बॅग तपासणी करुन हातचलाखी

Post Office Schemes 2023 | ‘या’ बचत योजनांमध्ये मिळतेय जबरदस्त व्याज, मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना फायदा

Summer Desserts | उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतील देशी मिठाईचे हे 5 प्रकार, तुम्ही ट्राय केले का?

Raw Mango Chutney | डायबिटीजमध्ये लाभदायक कैरीची चटणी, जाणून घ्या – अन्य फायदे आणि रेसिपी