Pune Crime News | पाण्याच्या टाकीतील मृतदेह गुढ उकलले ! चार दिवसांनंतर पत्नीने दिली कबुली; म्हणाली – ‘हा, मैने किया मर्डर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नर्‍हे येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये असणार्‍या पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचे गुढ उकलले असून त्याच्या पत्नीनेच त्याचा गळा दाबून खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मेरा पती घर से बाहेर गया था, उसको किसने मारा, मुझे पता नही, असे म्हणणार्‍या त्याच्या पत्नीला पोलिसांनी आपला खाक्या दाखविताच तिने हा मैनेच मर्डर किया साहब असे सांगत खुनाची कबुली दिली. तब्बल चार दिवसांच्या प्रयत्नांनंतर Crime गुन्हा Crime उघडकीस आणण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश आले. तिच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असून त्यासाठी पथके रवाना झाली आहेत.

ग्यानदेवी प्रसाद (रा. शिवनेरी, अभिनव कॉलेजजवळ, नर्‍हे, मुळ रा. बिहार) असे मृताच्या पत्नीचे नाव आहे. कृष्णकुमार प्रसाद असे खुन झालेल्याचे नाव आहे. पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाशी बोलू देत नाही. तसेच पतीचे बाहेर अनैतिक संबंध आहे, असा संशय तिला होता. कृष्णकुमार प्रसाद हा मारहाण करीत असे. त्याचा त्रासाला कंटाळून त्याला मारल्याचे ग्यानदेवी हिने पोलिसांना सांगितले.

कृष्णकुमार हा गेल्या एक वर्षांपासून नर्‍हे येथे आपल्या पत्नीसमवेत राहत होता.
तो सुतारकाम करीत असे. त्याची पत्नी ग्यानदेवी हिचे पहिले लग्न झाले असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.
कृष्णकुमार याच्याबरोबर ओळख झाल्यानंतर ती पती व मुलाला सोडून कृष्णप्रसादबरोबर पुण्यात राहायला आली आहे.

कृष्णकुमार हा गेल्या रविवारपासून बेपत्ता होता.
ग्यानदेवी हिने सिंहगड रोड पोलिसांकडे त्याची तक्रार केली होती.
त्यानंतर सोमवारी सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आला.
शवविच्छेदनात त्याचा गळा दाबून खुन झाल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा Crime दाखल केला.

टाकीत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी आसपास चौकशी करण्यास सुरुवात केली होती.
इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने तेथे फारशा लोकांची ये जा नव्हती.
त्यामुळे तपासाला मर्यादा आल्या होत्या.
त्यामुळे पोलिसांनी आजू बाजूच्या इमारतींमध्ये चौकशी करण्यास सुरुवात केली.
तेव्हा शेजारच्या काम सुरु असलेल्या इमारतीमधील एका महिलेने पोलिसांना मोठी माहिती दिली. घटना घडली, त्याच मध्यरात्री साडेतीन वाजता ग्यानदेवी तिच्याकडे आली होती.
तिने आपला नवरा आता गेला असून तो पुन्हा परत येणार नाही, असे तिने या महिलेला सांगितले होते.
त्याचबरोबर दुसर्‍या दिवशी सकाळी तिने इमारतीच्या मालकाला आपला नवरा बेपत्ता असल्याचे सांगितले व त्याचा शोध घेण्यासाठी पाण्याच्या टाकीत पाहण्याचा आग्रह केला होता.
या दोन गोष्टीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे आणि त्यांच्या पथकाने या महिलेकडे सातत्याने चौकशी सुरु ठेवली.
तिच्यावर उलट सुलट प्रश्नांची सरबत्ती केली.
शेवटी तिचा धीर संपला व तिने दोन साथीदारांच्या मदतीने पतीचा खुन केल्याची कबुली दिली.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)