Pune Crime News | मनमाडहून पुण्यात येऊन ती करत होती चोर्‍या ! ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र नेत होती खेचून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | पीएमपी बसमधील गर्दीचा (Theft In PMPML Bus) गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरुन नेण्याचे प्रकार वारंवार होत असतात. अनेक महिलांना आपल्या गळ्यातील दागिने कधी चोरुन नेले हे समजत नाही. अशावेळी एका ६७ वर्षाच्या ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधानाने दागिने चोरणार्‍या महिलेला पोलिसांनी पकडले. (Woman Arrest In Chain Snatching)

याबाबत आशाबाई डोंगर सनेर (वय ६७, रा. शिरपूर, सध्या देवाची उरळी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७६/२४) दिली आहे. पोलिसांनी दुपर्ता अशोक भोसले (वय २२, रा. मनमाड) हिला अटक केली आहे. ही घटना हडपसरमधील गाडीतळ बस डेपोत सोमवारी दुपारी १२ वाजता घडली. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशाबाई सनेर या उरळी देवाची येथे आपली मुलगी लीना पाटील यांच्या घरी रहायला आल्या आहेत.
त्या लीना पाटील यांच्यासह हडपसर ते उरळी देवाची या बसमध्ये चढत होत्या.
त्यावेळी आरोपी महिलेने गर्दीमध्ये फिर्यादी यांना खाली ओढले. त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. हा प्रकार त्यांच्या लगेच लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा करताच आजू बाजूच्या लोकांनी या महिलेला पकडले. बस डेपोमध्ये असलेल्या पोलिसांच्या हवाली केले. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Datta Nagar Crime | ‘तुला पण तुझ्या बापासोबत संपवून टाकतो’ ! पितापुत्राच्या पोटात चाकूने सपासप वार करुन जीव ठार मारण्याचा प्रयत्न

Fire At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवरील डब्याला मध्यरात्री आग; यार्डातील डबा जळून खाक, जीवित हानी नाही (Video)

TET Exam Scam | टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे एक कोटींचे दागिने न्यायालयाने केले परत