Pune Crime News | भटक्या कुत्र्यांच्या प्रेमापोटी महिलेला मारहाण करुन केला विनयभंग; वडगाव शेरीतील पॉश सोसायटीतील घटनेत तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेची गाडी आली असताना ते जबरदस्तीने सोसायटीच्या आवारात शिरले. त्यांनी सुरक्षारक्षकाच्या अंगावर गाडी घातली. सोसायटीतील आवारातील महिलांचे शुटींग केले. त्याचा जाब विचारल्यावर महिलेला मारहाण (Beating) करुन तिच्याशी अश्लिल वर्तन करत विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी एका ४८ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कपिल पटवर्धन (रा. एरंडवणे), निताशा पंकज सक्सेना (रा. विमाननगर) आणि सौम्या मामुनुरु (रा. वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील ब्रम्हा सनसिटी सोसायटीत ११ फेब्रुवारी रोजी घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी परिसरात भटकी कुत्री खूप झाली. त्यातून एका कुत्र्याने लहान मुलाला रक्तबंबाळ होईपर्यंत चावा घेतला होता. त्याविरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलनही केले होते. त्यामुळे महापालिकेची कुत्रा पकडणारी गाडी आली होती. त्यावेळी कपिल पटवर्धन व इतर हे परवानगी न घेता सोसायटीत आले. त्यांनी सुरक्षारक्षकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. सोसायटीच्या आवारातील महिलांचे मोबाईलमध्ये शुटींग केले. त्याचा जाब फिर्यादी यांनी विचारला असता कपिल पटवर्धन याने फिर्यादीशी अश्लिल वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर त्यांची गाडी भरधाव चालवून फिर्यादी यांच्या पायावरुन गाडीचे चाक नेऊन त्यांना जखमी केले. इतर महिलांनी हाताने मारहाण करुन आर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक आळेकर तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Woman beaten and molested for love of stray dogs;
A case has been registered against three people in the posh society incident in Vadgaon Sheri

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा