Pune Crime News | महिलेने आपल्या मुलगा, मुलीला नग्न करुन केली मारहाण; मुलीवर मानसिक उपचार करण्याची आली वेळ

पुणे : Pune Crime News | घटस्फोटासाठी न्यायालयात दावा चालू असताना महिलेने आपल्या ११ वर्षाची मुलगी व ८ वर्षाच्या मुलाला नग्न करुन मारहाण (Beating) करुन घराबाहेर उभे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी धानोरी येथील या मुलांच्या ४० वर्षाच्या वडिलांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुलांच्या आईवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१७ ते ६ मार्च २०१९ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी यांच्या शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात (Family Court) घटस्फोटाचा (Divorce) दावा चालू आहे. फिर्यादी यांच्या पत्नीने त्यांची ११ वर्षाची मुलगी व ८ वर्षाचा मुलगा यांना नग्न करुन मारहाण केली. त्यांना घरात कोंडून ठेवून ती बाहेर गेली. तसेच त्यांना नग्न करुन घराचे बाहेर उभे केले. बिल्डिंगचे खाली फेकून देण्याची धमकी दिली. मुलीला दुखापत केली.
त्यांच्या पत्नीने शारीरीक व मानसिक त्रास दिला. त्याचा परिणाम मुलीला मानसिक उपचार करण्याची वेळ आली.
याची माहिती मिळाल्यावर आता फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Woman beats her son, daughter naked; It’s time to treat the girl mentally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा