Pune Crime News | 6 लाखांची फसवणूक करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी, 3 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – विश्वास संपादन करुन एका महिलेकडून 5 लाख 75 हजार रुपये घेऊन ते परत न करता तिची आर्थिक फसवणूक केली. महिने पैसे मागितल्यावर कुटुंबाने तिला पैसे परत न करता तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुणे शहरातील (Pune City) समर्थ पोलीस ठाण्याच्या (Samarth Police Station) हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात तीन जणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. pune crime news woman got threaten after looted for 6 lakh pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सुरेश सुबराव भालेराव (वय-47), सुरेखा सुरेश भालेराव (वय-40), मयूर सुरेश भालेराव (वय-30 सर्व रा. के.के. वस्ती, सिंहगड रस्ता, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हा प्रकार मार्च 2014 ते 2021 या कालावधीत नाना पेठेत (Nana Pethe) घडला.

ISRO Recruitment 2021 | इस्त्रोमध्ये विविध पदासांठी भरती, ‘या’ उमेदवारांसाठी मोठी संधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी भालेराव कुटुंबीय एकमेकांच्या ओळखीच आहेत.
भालेराव कुटुंबाने फिर्यादी यांच्या आईचा विश्वास संपादन केला.
त्यांच्याकडून 5 लाख 75 हजार रुपये घेऊन सहा महिन्यात परत देण्याचे आश्वासन दिले.
परंतु मुदत संपून गेल्यानंतर देखील भालेराव कुटुंबाने उसने घेतलेले पैसे परत केले नाहीत.

भालेराव कुटुंबाने फिर्यादी आणि त्यांच्या आईला पैसे देण्यास नकार दिला.
तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी तक्रारदार यांनी न्यायालयात (Court) दाद मागितली होती.
न्यायालयाने पोलीस उपायुक्तांना (DCP) गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तीन जणांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Titel : pune crime news woman got threaten after looted for 6 lakh pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai High Court | बलात्कारामुळे गर्भवती राहिलेल्या तरुणीला दिलासा ! HC ची गर्भपातास परवानगी, विधी सेवा प्राधिकरणाने केली प्रक्रीया पुर्ण

BJP MLA Atul Bhatkhalkar । ‘तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबरानं लिहिलं जाईल’