Pune Crime News | पगार मागितल्याने अधिकाऱ्याकडून 43 वर्षीय महिलेचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील विमाननगर परिसरातील (Viman Nagar Pune) अधिकाऱ्याकडून एका 43 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना (Pune Crime News) समोर आली आहे. सिक्युरिटी गार्डची (Security Guard) नोकरी करीत असलेल्या महिलेने आपल्या अधिकाऱ्याकडे पगार अजून झाला नाही, कधी होणार अशी विचारणा केली. त्यावर त्या अधिका-याने या महिलेला तुझी पैशांची अडचण दूर होईल, असं म्हणत अश्लील वक्तव्य करून तिचा विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.

ही घटना विमाननगरमधील एका कंपनीच्या गेटवर 12 फेब्रुवारी रोजी घडली होती. रवींद्र काळे (Ravindra Kale) (वय, 45) असं त्या अधिका-याचे (Field Officer) नाव आहे. याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी महिला सिक्युरिटीची ड्युटी संपवून घरी जात होती. कंपनीच्या गेटवर रवींद्र काळे हा फिल्ड ऑफिसर होता. पगार कधी होणार, किती दिवस झाले अजून पगार झाला नाही, असे त्याला विचारले. त्यावर रवींद्र काळे हा फिर्यादीच्या जवळ येऊन म्हणाला, पगार उशिरा होणार आहे. माझ्याकडे 2 तास वेळ आहे. तुझी पैशांची अडचण दूर होईल, असे सांगून तिच्याबरोबर अश्लील वक्तव्य केले.

दरम्यान, त्याच्या मागणीला फिर्यादीने नकार दिल्यावर कोणाला काही सांगितले तर तुला कामावरून काढून टाकीन, अशी धमकीही दिली. याप्रकरणी त्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे.

Web Title :- Pune Crime News | woman molested by officer for demanding salary incidents in viman nagar area of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा