Pune Crime News | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, केटरिंगचे काम करण्याऱ्या पाच महिलांचा मृत्यू; 13 गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भरधाव वेगात जाणाऱ्या एका गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या ग्रुपला जोरात धडक दिली. यामध्ये पाच महिलांचा मृत्यू झाला तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात (Pune Crime News) सोमवारी (दि.13) रात्री पावणे अकराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) राजगुरुनगर जवळच्या शिरोरी परिसरातील खरपुडी फाट्यावर झाला. ही गाडी पुण्याच्या बाजूने भरधाव वेगात येत होती. अपघातात (Terrible Accident) दोन महिलांचा जागीच मृत्यू (Death) झाला तर तीन महिलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुनंदा सटवा गजेशी, सुशीला वामन देढे (रा. रामटेकडी शांतीनगर), इंदुबाई कोंडीबा कांबळे (रा. किरकटवाडी, सिंहगड रोड), सायराबाई प्रभु वाघमारे (हडपसर) असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. शोभा राहुल गायकवाड, सारीका देवकर, वैषाली धोत्रे, शोभा शिंदे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Pune Crime News)

अपघातातील जखमी आणि मयत महिला या अपघात स्थळापासून जवळ असलेल्या मंगल कार्यालयात वाढपी काम (Catering) करण्यासाठी आल्या होत्या.
यासर्व महिला स्वारगेट (Swargate) येथून पीएमटी बसने शिरोली येथे उतरल्या.
खरपुडी येथील मंगल कार्यालयात मंगळवारी असलेल्या लग्न कार्यक्रमात स्वयंपाक करुन वाढपी काम करण्यासाठी जात असताना घोळक्याने रस्ता ओलांडत होते. त्यावेळी पुण्याकडून एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा एक्सयुव्ही (Mahindra XUV) किंवा टियुव्ही या मॉडेलच्या कारची धडक या महिलांना बसली.

कारची धडक बसल्यानंतर रात्री अंधारात महिलांचा आरडाओरडा सुरु झाला. रस्त्यावर रस्ताचा सडा पडला होता.
जखमींवर चांडोली ग्रामीण रुग्णालय, राजगुरुनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात उपचारासाठी
दाखल केले आहे. याबाबत शिवानी कैलास माने (रा. सातारा रोड, स्वारगेट) यांनी खेड पोलीस ठाण्यात
(Khed Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Web Title :-  Pune Crime News | women crushed by vehicle on pune nashik highway five women killed on the spot five seriously 13 injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Weather News | पुण्यात पुन्हा वाढला गारठा; किमान तापमान गेले सिंगल डिजिटमध्ये, आल्हाददायक वातावरणाचा अनुभव

Ravikant Tupkar | रविकांत तुपकरांचा जामीनअर्ज न्यायालयाने स्विकारला; उद्या सुनावणीची शक्यता…

Balasaheb Thorat | राधाकृष्ण विखेंच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…