Pune Crime News : कामगार तरूणाने मित्रांना बोलावून सुपरवायझरवर केले कोयत्याने वार, नर्‍हे येथील घटना

पुणे : (Pune) पोलीसनामा ऑनलाईन – Pune कंपनीच्या सुपरवायझरने कुठं फिरतो असे विचारल्याचा राग आल्याने कामगार तरुणाने मित्रांना बोलवून कोयत्याने वार केल्याची घटना नऱ्हे येथे घडली आहे. दोघांना अटक केली आहे.

रोहित चौगुले (वय 21) व तुषार चव्हाण (वय 21) या दोघांना अटक केली आहे. तर त्याचे साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी संदीप नाईक (वय 43, नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरात एक कंपनी आहे. स्टिकर बनविण्याची हि कंपनी आहे. तेथे फिर्यादी सुपरवायझर आहेत.

तसेच तुषार हा येथे काम करत होता.

यादरम्यान काही दिवसापूर्वी फिर्यादी सुपरवायझर हे कंपनीत असताना तुषार हा त्यांना दुसऱ्या विभागात फिरत असताना दिसून आला.

यामुळे त्यांनी तुषारला चहा नाश्ता करून घे आणि तुला दिलेले काम कर असे सांगितले.

याचा राग तुषार याला आला होता.

त्याने या रागातून तीन दिवसापूर्वी फिर्यादी यांना रात्री 9 च्या दरम्यान नऱ्हेत गाठले तसेच त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले.

तर इतरांनी लाकडी बांबूने बेदम मारहाण केली आहे. यात फिर्यादी हे जखमी झाले. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस Sinhagad Police करत आहेत.

 

Also Read This : 

 

‘पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती’, नितेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

 

weight loss yoga exercise : वजन कमी करून ‘हेल्दी अँड फिट’ बॉडी मिळवण्यासाठी करा ‘ही’ 5 योगासन

 

शिवसेनेचे भाजपवर टीकेचे बाण, म्हणाले – ‘ट्विटरच्या अतिरकेचा वापर करूनच भाजपनं निवडणुका जिंकल्या, मग आता मोदी सरकारचा विरोध का?’

 

वाढत्या वयात देखील जवान दिसाल, फक्त रताळ्यापासून बनवलेले ‘अ‍ॅन्टी एजिंग फेसपॅक’ वापरा, जाणून घ्या

 

Corona Vaccination | ‘कोविशील्ड’ घेतलेल्यांना मोठा दिलासा तर ‘कोव्हॅक्सिन’ अन् ‘स्पुटनिक’ लस घेतलेल्यांना धक्का, जाणून घ्या

 

शुगर कंट्रोल करणे नाही अशक्य, फक्त हवामानानुसार बदला स्वतःचं रूटीन, जाणून घ्या

 

Eknath Khadse on Devendra Fadnavis | … तर फडणवीस लगेच सरकार स्थापन करायला तयार होतील, एकनाथ खडसेंचा सणसणीत टोला

 

प्रत्येकवेळी पचनक्रिया बिघडते तर एकदा ‘हे’ उपाय करून पाहा, जाणून घ्या

 

वॅक्सिंग आणि शेव्हिंग नाही, सुंदर पाय दिसण्यासाठी करा ‘हे’ 6 उपाय