Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : येरवडा पोलिस स्टेशन – येरवडा कारागृहात पुन्हा सापडला मोबाईल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) स्वच्छतागृहात काही दिवसांपूर्वी एक मोबाईल सापडला असताना आता पुन्हा एकदा एका कैद्याकडे मोबाईल आढळून आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

अश्विन आनंदराव चव्हाण (Ashwin Anandrao Chavan) असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत तुरुंग अधिकारी अमोल जाधव Yerwada Jail Officer Amol Jadhav (वय ३७, रा. लोहगाव – Lohegaon) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३५/२३) दिली आहे. हा प्रकार येरवडा मध्यवर्ती कारागृहातील (Yerwada Central Jail) सर्कल क्रमांक एक, बॅरेक क्रमांक एकमध्ये शुक्रवारी रात्री दोन वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव परिसरात भरदिवसा गोळीबार (Firing In Pimpale Gurav Pimpri) करुन योगेश जगताप याचा खून (Murder Of Yogesh Jagtap) केल्याप्रकरणात अश्विन चव्हाण याच्यासह तिघे फरारी होते. त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्यांनी चाकण परिसरातील कोये येथे गोळीबार (Firing On Police In Chakan) केला होता. तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांनी आरोपीच्या अंगावर तेथील झाड फेकून मारले होते. त्यात अश्विनसह तिघांना अटक केली होती. त्यात त्यांना न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) ठेवण्यात आले आहे. (Pune Crime News)

बॅरेक क्रमांक एक मधील खिडकी क्रमांक २ मध्ये मध्यरात्री २ वाजता सुरक्षा रक्षकांना एक मोबाईल आढळून आला.
त्यात बॅटरी व सीम कार्ड आढळून आले. कारागृहात बंदी असतानाही हा मोबाईल अश्विन चव्हाण याने आणला असल्याचे दिसून आल्याने
त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे (Sub-Inspector of Police Ashok Kate) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Yerawada Police Station-Mobile phone found again in Yerawada Jail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा