Pune Crime News | येरवडा कारागृहात कैद्यामध्ये पुन्हा राडा ! कैद्यावर धारदार वस्तूने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील येरवडा कारागृहात (Yerwada Jail) पुन्हा एकदा कैद्यांमध्ये राडा झाला आहे. कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका कैद्याने सोमवारी पहाटे धारदार टिनच्या तुकड्याने हल्ला करुन अंडरट्रायल कैद्याला गंभीर जखमी केले आहे. येरवडा कारागृहात कैद्यांच्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. (Pune Crime News)

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक एक मधील बॅरेक क्रमांक आठ मधील मोकळ्या व्हरांड्यामध्ये ही घटना घडली आहे. नुकताच न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) मिळाल्यानंतर कारागृहात दाखल झालेला अंडरट्रायल कैदी ऋषभ उर्फ सनी शेवाळे आणि त्याच्या साथीदारांना ठेवण्यात आले आहे. शेवाळे याच्यावर बारामती येथील रोहन हरिदास माने या आणखी एका कैद्याने हल्ला केला.

या हल्ल्यात ऋषभ शेवाळे याच्या गालावर आणि डोळ्यावर वार करण्यात आले आहेत.
हा प्रकार लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या कारगृहातीच्या रक्षकांनी माने याला जबरदस्तीने पकडले.
माने याच्यावर आयपीसी 324 नुसार धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे,
अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली. ऋषभ शेवाळे आणि त्याच्या साथीदारांना
लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

क्षमतेपेक्षा अधिक कैदी

येरवडा कारागृहातील कैद्यांची क्षमता सध्या 2 हजार 526 इतकी आहे. परंतु त्या ठिकाणी सध्या 6 हजार 484 कैदी
ठेवण्यात आले आहेत. कारागृहाच्या क्षमतेपेक्षा कैद्यांची संख्या दुप्पट आहे. त्यात न्यायालयीन कैद्यांची संख्या अधिक आहे.
त्यामुळे झोपण्याच्या जागेपासून अंघोळ, स्वच्छतागृहात जाणे अशा छोट्या मोठ्या गोष्टींवर कैद्यांमध्ये वाद होत असतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Crisis | निवडणूक आयोगाने एकांगी निर्णय घेतला, शरद पवार गटाचा आरोप; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

Pune Crime News | ससूनमधील वॉर्ड नंबर 16 म्हणजे श्रीमंत गुन्हेगारांचे दुसरे घर, अनिल भोसले, रुपेश मारणेसह अनेक अट्टल गुन्हेगारांचा ससूनमध्ये मुक्काम