Pune Crime News | येरवडा पोलिसांकडून कल्याणीनगरमधून डेल कंपनीचा लॅपटॉप चोरी करणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | येरवडा पोलिस स्टेशनमधील (Yerwada Police Station) तपास पथकाने लॅपटॉप चोरी (Laptop Theft) करणार्‍याला अटक केली आहे. त्याच्याकडून 1 लाख 25 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप जप्त केला आहे. अटक आरोपीने कल्याणीनगर परिसरातून डेल कंपनीचा लॅपटॉप चोरला होता. त्याच्याकडून 1 लाख 25 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

साजीद अली हसन अन्सारी Sajid Ali Hassan Ansari (34, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. येरवडा पोलिस स्टेशनमधील पोलिस अंमलदार तुषार खराडे, पोलिस दत्ता शिंदे आणि पोलिस सुरज ओंबासे हे सदरील गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना आरोपी हा येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात आल्याची माहिती मिळाली होती. (Pune Crime News)

प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचुन पोलिसांनी आरोपीला अटक केली.
आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत काय याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत.
अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) , पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav), वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Sr PI Balkrishna Kadam),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयदिप गायकवाड (Police Inspector Jaydeep Gaikwad)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे,
पोलिस अंमलदार गणपत थिकोळे, पोलिस दत्ता शिंदे, पोलिस तुषार खराडे, पोलिस किरण घुटे, पोलिस अमजद शेख, पोलिस सागर जगदाळे,
पोलिस कैलास डुकरे, पोलिस अनिल शिंदे, पोलिस राहुल परदेशी, पोलिस सुरज ओंबासे, पोलिस दत्तात्रय शिंदे, पोलिस प्रशांत कांबळे, पोलिस अश्विन देठे आणि पोलिस सुशांत भोसले यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

 

Web Title :  Pune Crime News | Yerwada police arrested a person who stole Dell company laptop from Kalyaninagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा