Pune Crime News | बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशाचा मोबाईल व खिशातील रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई विश्रांतवाडी परिसरात केली.

सोमेश सुभाष कुसाळे Somesh Subhash Kusale (वय-25 रा. टिंगरेनगर, पुणे), संतोष गरिबदास खंडागळे Santosh Garibdas Khandagale (वय-31 रा. महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) आयपीसी 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 ऑगस्ट रोजी गुंजन चौकातील बस स्टॉपवर घडली होती.

फिर्यादी हे गुंजन चौकातील बस स्टॉपवर थांबले असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांचा मोबाईल आणि खिशातील 1200 रुपये जबरदस्तीने हिसकामारुन चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अमजद शेख (Police Officer Amjad Sheikh) व अनिल शिंदे यांना माहिती मिळाली की, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी विश्रांतवाडी परिसरात येणार आहेत.

पोलिसांनी आरोपींचा विश्रांतवाडी परिसरात शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली 40 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे (PSI Ankush Dombale ) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Additional CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior PI Balkrishna Kadam), पोलीस निरीक्षक गुन्हे कांचन जाधव (PI Kanchan Jadhav),
जयदिप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे (PSI Ankush Dombale),
पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे (PSI Pradeep Surve),
पोलीस अंमलदार गणपत थिकोळे (Police Officer Ganpat Thikole),दत्ता शिंदे,
तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे,
अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | ट्रक व मिक्सरच्या महागड्या बॅटर्‍या चोरणारा भारती विद्यापीठ पोलिसांकडून गजाआड, 8 गुन्हे उघडकीस