Pune Crime News | महिलेसोबत गैरवर्तन करुन विनयभंग, युवकाला अटक; खडकी मधील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महिलेचा वारंवार पाठलाग करुन महिला प्रतिसाद देत नसल्याने युवकाने महिलेला मिठी मारुन विनयभंग (Molestation) केल्याची घटना खडकी परिसरात घडली आहे. याप्रकरणी युवकाला खडकी पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. हा प्रकार 13 नोव्हेंबर रोजी रात्री सातच्या सुमारास पड्याळ वस्ती येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पड्याळ वस्ती येथे राहणाऱ्या 39 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जितेश उर्फ बाबु श्रीपाल लोहार (वय-37 रा. रेंजहिल्स, खडकी) याच्यावर आयपीसी 354अ, 354ड नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात. आरोपी पीडित महिलेचा पाठलाग करत होता. मात्र महिला आरोपीला कोणताही प्रतिसाद देत नव्हती. पीडित महिला पड्याळ वस्ती येथील एका दुकानात गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने पाठिमागून येऊन महिलेला मिठी मारत गैरवर्तन करुन महिलेचा विनयभंग केला. तसेच वारंवार महिलेच्या घरासमोर उभा राहून घरात डोकावून पाहत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा विनयभंग, नानापेठ येथील घटना

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीला अटक

बनावट कागदपत्रांद्वारे मिळकत हडपण्याचा प्रयत्न, शिवाजीनगर परिसरातील घटना

दीडपट परतावा देण्याच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील प्रकार

रिक्षाचालकावर धारदार हत्याराने हल्ला, दोघांवर FIR; मांजरी येथील घटना

फ्लॅटचा ताबा न देता 30 लाखांची फसवणूक, मार्केट यार्डमधील घटना

बहिणीला कामावरुन कमी केल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Maximizing Your Money: How Auto Sweep Facility Turns Savings Into Wealth

Pune Pimpri Crime News | आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार