Pune Crime News | येरवडयात 70 वर्षाच्या ज्येष्ठाला मारहाण, अपमान सहन न झाल्याने केली आत्महत्या

हळदीच्या कार्यक्रमात गोंधळ व स्पिकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हळदीच्या कार्यक्रमात गोंधळ व स्पिकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने टोळक्याने ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकासह (Senior Citizen) इतरांना मारहाण (Beating) केली. हा अपमान सहन न झाल्याने त्यांनी नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वराच्या गळ्यात हार पडण्याऐवजी पोलिसांनी (Pune Police) हातात बेड्या घातल्या. (Pune Crime News)

ज्ञानेश्वर साळुंखे (वय ७०, रा. नवी खडकी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे Pandurang Dnyaneshwar Salunkhe (वय ४७) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६३/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चेतन बेले (वय २६), देवेश ऊर्फ नन्या पवार Devesh alias Nanya Pawar (वय १८), यश मोहिते (वय १९), शाहरुख खान (वय २६), जय तानाजी भडकुंभे Jai Tanaji Bhadkumbhe (वय २२, सर्व रा. जिजामातानगर, येरवडा – Jijamatanagar Yerwada) यांना अटक केली आहे. सादीक शेख, सनी धुमाळ यांच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार नवी खडकी येथे २८ मे रोजी रात्री साडेनऊ ते सव्वा दहा वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साळुंखे यांच्या घराशेजारी राहणारा चेतन बेले याच्या लग्नाचे हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी स्पिकरचा मोठा आवाज व खूप गोंधळ सुरु होता.
त्यामुळे ज्ञानेश्वर साळुंखे हे आवाज करु नका, आम्हाला त्रास होत असे सांगण्यास गेले.
तेव्हा आरोपींनी त्यांना हाकलून दिले. त्यानंतरही गोंधळ चालू होता.
त्यामुळे ते पुन्हा आवाज कमी करावा हे सांगण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यांच्या घरातील लोक त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली.
चेतन बेले याने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले.
त्यांनी फिर्यादी हे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.
त्या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादीचे वडिल ज्ञानेश्वर साळुंखे यांना पुन्हा मारहाण केली.
मारहाणीमुळे होणार्‍या वेदना व अपमान सहन न झाल्याने त्यांनी बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन
आत्महत्या केली. येरवडा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक शेलार (PSI Shelar) तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Youth Beating Senior Citizen After That He commit suicide Yerwada Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘काँग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंची लाचारी!!’, ‘ते’ फोटो ट्विट करत भाजपचा टोला

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : तुमच्या भागातील नाले सफाईची कामे झाली नसतील तर ‘या’ 2 मोबाईलवर संपर्क साधा, जाणून घ्या नंबर

Adipurush Cinema | आदिपुरूष चित्रपटाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अवघ्या तासाभरात केला मिलियनस टप्पा पार (VIDEO)