Pune Crime News | हक्काचे पैसे न दिल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आईवडिल, भावावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Pune Crime News | वडिलांनी परस्पर नावावर कर्ज काढल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या तरुण मुलाने गळफास (Suicide In Pune) घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी मुलाचे आईवडिल, भावावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News )

अभिजित मच्छिंद्र कदम (वय ३८, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी दिपाली अभिजित कदम (वय ३८) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीचा दीर अनिकेत मच्छिंद्र कदम (वय ३१), सासु कुसुम मच्छिंद्र कदम (वय ५६) आणि सासरे मच्छिंद्र नामदेव कमद (वय ६२) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News )

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती अभिजित कदम हे गेल्या ५ -६ वर्षांपासून
सासु सासर्‍यांपासून वेगळे रहात आहेत. अभिजित हे महापालिकेत कामगार पुरविण्याचे काम करतात.
अभिजित यांच्या वडिलांनी त्याच्या नावावर कर्ज काढले होते.
त्या कर्जाचे हप्ते अभिजित याच्या खात्यातून वळते केले जात होते. त्यामुळे त्याने नेमलेल्या कामगारांचे पगार, त्यांचा पॉव्हिडंट फंड व अन्य बाबीसाठी पैसे कमी पडत होते. त्यांनी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्याने महापालिकेने त्यांना नोटीस बजावली होती. वडिल, भावाकडे त्यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे अभिजित आर्थिक अडचणीत आला होता. त्यामुळे त्याने ही सर्व बाब सुसाईट नोट मध्ये लिहून १८ मे २०२३ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या या सुसाईट नोटमध्ये खाडाखोड असल्याने पोलिसांनी ती तपासणीसाठी हस्ताक्षरतज्ञांकडे पाठविली होती. त्यांच्या अहवालानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCOS Awareness Month | महिलांनो, ही 10 लक्षणे आढळल्यास करू नका दुर्लक्ष, असू शकतो पीसीओएस, कारण, रिस्क फॅक्टर्स जाणून घ्या

Kodo Millet Benefits | आकाराने छोटे, पण पोषक तत्वाचे पॉवरहाऊस, कोलेस्ट्रॉलपासून शुगरपर्यत 5 मोठ्या आजारात अमृत समान