Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या (Phoenix Mall Pune) इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) सायंकाळी वाहनतळाच्या आवारात घडला. रिचर्ड एबल झकेरिया (वय-25 रा. फुलेनगर, येरवडा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Pune Crime News)

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी फिनिक्स मॉलचा वाहनतळ आवारात सातव्या मजल्यावरुन पडल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला तातडीने ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषीत केली. यानंतर पोलिसांनी मृत तरुणाची ओळख पटवली. (Pune Crime News)

मृत रिचर्ड हा विमाननगर येथील एका खासगी वित्तीय संस्थेत काम करत होता. शुक्रवारी सकाळी तो कामावर आला होता.
त्यानंतर सायंकाळी तो फिनिक्स मॉलमध्ये गेला. तो सातव्या मजल्यावरुन कसा पडला याची माहिती मिळू शकली नाही.
त्याच्या पश्चात आई-वडिल असा परिवार आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे (Viman Nagar Police Station)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Sr PI Vilas Sonde) यांच्या मागर्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Supriya Sule | ‘ते वक्तव्य अजित पवारांना उद्देशून नव्हतं’ सुप्रिया सुळेंनी केला खुलासा (व्हिडिओ)