Pune Crime News | बोपदेव घाटात पुन्हा युगलाला लुटले

पुणे : Pune Crime News | बोपदेव घाटातील टेबल पॉईंटवर (Table Point, Bopadeo Ghat) फिरायला येणार्‍या युगलांना मारहाण (Beating) करुन लुटण्याचे अनेक प्रकार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एका टोळीला पकडले. त्यानंतरही रविवारी भर दुपारी एका युगलाला मारहाण करुन लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी कोंढवा येथील एका २४ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार टेबल पॉईंटवर रविवारी दुपारी दीड वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आपल्या मैत्रिणीबरोबर मोटारसायकलवरुन फिरायला बोपदेव घाटात गेले होते. ते टेबल पॉईंट येथे थांबले.
तेथून ते निघाले असताना मोटारसायकलवरुन दोघे जण तेथे आले. त्यांनी फिर्यादीच्या मोटारसायकलसमोर गाडी आडवी उभी करुन त्यांना थांबायला भाग पाडले. फिर्यादींना हाताने मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोन्याची १ तोळ्याची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून ते पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते (Assistant Police Inspector Mohite) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Yugla was robbed again at Bopadeo Ghat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime News | मुंबईतील आयआयटीमध्ये 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘शिवाजी महाराजांचा अपमान करणारं…’, उद्धव ठाकरेंचा भगतसिंह कोश्यारींना खोचक टोला

Beed Crime News | दुर्देवी ! विजेचा धक्का लागल्याने 18 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू