Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात ‘हार्पिक’ पाजल्याच्या पत्नीच्या आरोपानंतर पतीची ‘आत्महत्या’, सुसाईड नोटमध्ये लिहलं…

पुणे : Pune Crime | पती पत्नीच्या भांडणात दिराने हार्पिक पाजल्याचा आरोप  केल्याने पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Suicide Note) करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली (Pune Crime) होती.

निखिल शाम धोत्रे (वय २९, रा. सुगम मंडळ, गोखलेनगर) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी, निखिल धोत्रे याचे एक वर्षापूर्वी सोनाली हिच्याबरोबर लग्न झाले होते. ती सध्या ९ महिन्यांची गर्भवती आहे. बाळंतपणासाठी तिचे नाव कोठे नोंदवायचे यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. कमला नेहरु रुग्णालयात तिचे नाव नोंदविले होते. तर खासगी रुग्णालयात बाळंतपण व्हावे, असे निखिलचे म्हणणे होते. दोन दिवसांपूर्वी सोनाली हिला टॉयलेट क्लिनर पिल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत तिने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यात तिने म्हटले आहे की, आपण बहिणीबरोबर बोलत होतो. त्यावरुन घरात वाद झाला. फोनवर का बोलते, असे म्हणून पतीने मारहाण केली. त्यावेळी दिराने हार्पिक हे टॉयलेट क्लिनर पाजले. या फिर्यादीवरुन पोलिसांनी पती, दिरासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोनाली हिच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

Malicious Apps | सावधान ! तात्काळ आपल्या फोनमधून DELETE करा ‘हे’ 8 अ‍ॅप, Google ने केले बॅन; जाणून घ्या लिस्ट

दरम्यान, रविवारी दुपारनंतर निखिल धोत्रे हा एकटाच आपल्या बेडरुममध्ये होता. सायंकाळी त्याच्या भावाने दरवाजा वाजविला तर त्याने उघडला नाही़ म्हणून त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले तर निखिल याने पत्नीच्याच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. आत्महत्या करण्यापूर्वी निखिल याने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आढळून आले़. त्यात त्याने ‘‘आपल्याला सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला आहे. त्यांच्यामुळे आपण कर्जबाजारी झालो आहे. माझ्या मृत्युला तेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे म्हणून त्यात सासरकडच्या सर्वांची नावे लिहिली आहेत. त्याच चिठ्ठीत त्याने ‘आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे’, असे लिहिले आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी (chaturshringi police) अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | लाेणी काळभाेर परिसरात दहशत पसरविणारी टोळी तडीपार

Payment Aggregators | डेबिट, क्रेडिट कार्ड नंबरसह एक्स्पायरी आणि CVV सुद्धा आता ठेवावा लागेल लक्षात; RBI करतंय मोठा बदल; जाणून घ्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | nikhil dhotre suicide news pune crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update