Pune Crime | उपचार घेणाऱ्या पत्नीला पाहिल्यानंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | येथील गोखलेनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी सायंकाळी किरकोळ वादातून कुटुंबातील सदस्यांनी पत्नीला टॉयलेट क्‍लीनर पाजल्याचे समोर आले. घटनेनंतर रुग्णालयात जाऊन पत्नीला पाहिल्यानंतर पतीने स्वतः गळफास (Pune Crime) घेऊन आत्महत्या (Suicide) केली. निखिल धोत्रे (वय 28, रा.गोखले नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, निखिलने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळेच आत्महत्या करीत असल्याचे म्हंटले आहे.या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात (chaturshringi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp द्वारे बुक करू शकता कोविड व्हॅक्सीनेशनचा स्लॉट, जाणून घ्या सोपी पद्धत

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे (Senior Police Inspector Rajkumar Waghchaure) यांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल हा इमारतींच्या सेंटरिंगचे काम करीत होता. गोखलेनगर मध्ये निखिल गर्भवती पत्नी, भाऊ व आई समवेत राहत होता. बुधवारी (दि १८) निखिलची पत्नी फोनवर बोलत असताना कुटुंबीयांची तिच्यासमवेत भांडणे झाली. त्यावेळी निखीलने पत्नीला मारहाण केली. तर इतरांनी निखीलच्या पत्नीला टॉयलेट क्‍लिनर पाजले. त्यानंतर तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी निखिल, त्याची आई व भावाविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रविवारी निखिल पत्नीला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला असता सासरच्या मंडळींनी त्याचा अपमान केला. निखिलकडून सासरच्या मंडळींनी १ लाख ३० रुपये घेतल्याने तो कर्जबाजारी झाला होता. या सर्व गोष्टींमुळे तो नैराश्‍यात होता. त्यानंतर रविवारी घरात कोणी नसताना त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिलचे कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस तपास करीत आहेत.

आई माझ्या बाळाची काळजी घे !

निखिलने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये त्याने आई तु काळजी करू नको, मी पुन्हा तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईल. माझ्या बाळाला सांभाळ. त्याची काळजी घे. अशा शब्दात आईला भावनिक साद घातली आहे. सासुरवाडीकडून होणाऱ्या छळास कंटाळून आपण आत्महत्या करत आहे. या चिठ्ठीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांच्या नावांचा उल्लेख असून त्यांना निखिलने सासुरवाडीच्या लोकांवर कडक कारवाई करण्याची विनंतीही केली आहे.

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील शिवसैनिक आक्रमक; भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या (व्हिडीओ)

Pune Farmer Suicide | आत्महत्येनंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील पण, माझे वडील पुन्हा परत येतील का?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pune crime | nikhil dhotre suicide news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update