Pune Crime | गांजाची विक्री करणारा नितीन डुकळे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | गांजा विक्री करणा-‍या व्यक्तीस लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन लाख ६२ हजार ५६० रुपयांचा १३ किलो २२८ ग्रॅम गांजा आणि मोटारसायकलसह मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी (Pune Crime) सुनावली आहे.

नितीन मोहन डुकळे (वय २५, रा. गायरान वस्ती, वाघेश्वरनगर, वाघोली) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याच्याविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात (LoniKand Police Station) गुन्हा दाखल आहे. वाघेश्वरनगरमधील कचरा डेपोसमोरील रस्त्यावर मंगळवारी (ता.२४) आरोपीला अटक करण्यात आली.
जप्त करण्यात आलेला गांजा आरोपीने कोठून व कोणाकडून आणला? तो गांजा कोणला देणार होता? गांजा विक्री करणा-‍यांची टोळी असून त्या अनुषंगाने तपास करणे तसेच इतर साथीदार असतील तर त्यांना अटक करून एकत्रित तपास करण्यासाठी आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव (Government Advocate Vijay Singh Jadhav) यांनी केली.
न्यायालयाने ती मान्य करीत आरोपीस ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या गुन्ह्याचा तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सूरज गोरे (PSI Suraj Gore) करीत आहे.

 

Web Title : Pune Crime | Nitin Dukle arrested for selling cannabis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Earn money | YouTube चा ‘हा’ प्रोग्राम 20 लाख लोकांसाठी बनला इन्कमचे माध्यम, तुम्ही सुद्धा यातून करू शकता लाखोंची कमाई; जाणून घ्या

Modi Government | 12 कोटी लोकांवर मोदी सरकार होणार मेहरबान, वार्षिक मिळतील 12000 रुपये; जाणून घ्या

Pune Crime | सिमकार्ड अपडेट करणे पडले महागात, ऑनलाइन दीड लाखांचा गंडा