Pune Crime | पुणे पोलिसांकडून प्रसिध्द अभिनेता अनिकेत विश्वासरावला नोटीस, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मराठी नाटक आणि सिने जगतातील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव (aniket vishwasrao) याच्याविरुद्ध पत्नीच्या छळ केल्याप्रकरणी  कौटुंबिक हिंसाचाराचा (domestic violence) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे. या गुन्ह्यात जबाब नोंदविण्याकरिता हजर राहण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी (Senior Police Inspector Pratibha Joshi) यांनी दिली. अभिनय क्षेत्रामध्ये पत्नीचे नाव आपल्यापेक्षा मोठे होईल या भीतीने तिला वारंवार मारहाण करण्यात आल्याची आणि मानसिक व शारीरिक छळ (Mental and physical abuse) केल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दिलेली आहे.

 

अलंकार पोलिसांनी (alankar police station) अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रशेखर विश्वासराव (Chandrasekhar Vishwasrao) आणि सासू आदिती विश्वासराव Aditi Vishwasrao (सर्व रा. विश्वासराव रेसिडेन्सी, मुंबई) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अभिनेत्री स्नेहा अनिकेत विश्वासराव sneha aniket vishwasrao (वय 29, रा. करिष्मा सोसायटी, कोथरूड – Karisma Society, Kothrud) हिने फिर्याद (Pune Crime) दिली आहे. अनिकेत याने लग्न झाल्यापासून त्याचे अनैतिक संबंध Immoral relations लपवुन ठेवले. वारंवार जीवे ठार मारण्याची धमकी देऊन हाताने मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी आणि लोकांमध्ये अपमानास्पद वागणूक देऊन अतोनात छळ केला. सर्व अत्याचारांमध्ये सासरे चंद्रशेखर आणि सासू आदिती यांनी दुजोरा दिला.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) आदेशानुसार, कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात आरोपी पतीचा जबाब घेणे आवश्यक आहे.
त्याकरिता त्याला नोटीस (Pune Police Give Notice To Aniket Vishwasrao) बजावण्यात आली असून
जबाब नोंदविण्याकरिता पोलीस ठाण्यात (Pune Crime) हजर राहण्याबाबत नोटीसीद्वारे कळविण्यात आले आहे.
येत्या एक दोन दिवसात तो जबाब देण्याकरता अलंकार पोलीस ठाण्यात हजर राहण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Pune Crime| Notice to famous actor Aniket Vishwasrao from Pune Police, find out the case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा