Pune Crime | कुख्यात अमली पदार्थ तस्कराला गुन्हे शाखेकडून अटक, वर्षभरापासून होता फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शहरातील विविध भागात अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी पथक एकने (Anti Narcotics Cell) अटक केली. मागील एक वर्षापासून तो (Pune Crime) फरार होता. त्याच्याकडून 91 हजारांचे मेफेड्रोन Mephedrone (एमडी), मोबाइल, मोटार असा 6 लाख 36 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आसिफ पटेल (Asif Patel) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक एक बिबवेवाडी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गंगाधाम परिसरात कुख्यात अमली पदार्थ तस्करी करणारा थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आसिफ पटेल याला ताब्यात (Arrest) घेत त्याच्या वाहनाची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 91 हजारांचे 7 गॅ्रम मेफेड्रोन, 45 हजारांचा मोबाइल, मोटार, असा मिळून 6 लाख 37 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1
गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड
(Senior Police Inspector Vinayak Gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर
(API Shailaja Jankar), योगेश मोहिते, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Notorious drug trafficker arrested by crime branch, absconding for a year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा