Pune Crime | पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळला ‘त्या’ प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रॅलीसाठी गाडी पाहिजे असे म्हणत चॉपरचा धाक दाखवून जबरदस्तीने जीप घेऊन गेल्याप्रकरणी कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला जामीन मंजूर झाला आहे. घायवळ याला एक लाख रुपयांच्या (Pune Crime) जातमुचलक्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश संदीप शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात नीलेश घायवळ व त्याच्या टोळीतील सदस्य संतोष धुमाळ, कुणाल कंधारे, मुसाब उर्फ मुसा इलाही शेख, अक्षय गोगावले, विपुल माझीरे आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संतोष धुमाळ व मुसाब उर्फ मुसा इलाही शेख यांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. याबाबत राज चंद्रकांत कदम यांनी फिर्याद दिली होती. (Pune Crime)
चॉपरचा धाक दाखवून जबरदस्तीने रॅलीसाठी जीप घेऊन जाणाऱ्या घायवळ टोळीतील आठ जणांवर खंडणीविरोधी पथकाने दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी नीलेश घायवळ याने जामिनासाठी अॅड. आबाद पोंडा व अॅड. विपुल दुशिंग यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
नीलेश घायवळ याच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे.
तसेच गुन्हा घडल्यानंतर 15 ते 16 महिन्यांनंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गुन्हा घडला त्यावेळी घायवळ हा तुरुंगात होता, असा युक्तिवाद पोंडा यांनी केला.
हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश संदीप शिंदे यांनी अटी आणि शर्तींवर नीलेश घायवळ याचा जामीन मंजूर केला आहे.
Web Title :- Pune Crime | notorious gangster nilesh ghaiwal granted bail mumbai bombay high court
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Udayanraje Bhosale | माझ्यामुळे भाजपची अडचण होत असेल, तर… – उदयनराजे भोसले
MNS Chief Raj Thackeray | सिंधुदुर्गमध्ये एन्ट्री करताच राज ठाकरेंचा विरोधकांना सूचक इशारा, म्हणाले…
Police Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश