Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर काढला नग्न व्हिडिओ; बारामतीमधील खळबळजनक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महाविद्यालयातील 21 वर्षीय विद्यार्थ्याला (Student) लुटून त्याला नग्न करून व्हिडिओ (Nude Video) काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) परिसरात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Government Medical College) विद्यार्थ्यासोबत घडला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याने अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात (Pune Crime) तक्रार दिली आहे. बारामती तालुका पोलिसांनी (Baramati Taluka Police Station) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत असून, वसतिगृहात राहतो. रविवारी (दि.4) सायंकाळी विद्यार्थी बारामती येथील एका मॉलमध्ये खरेदी करून दुचाकीवरून वसतिगृहाकडे निघाला होता. काही अंतरावर चोरट्यांनी त्याला आडवून शिवीगाळ करून दमदाटी करत खिशातील 15 हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. (Pune Crime)

 

त्यानंतर चोरट्यांचे इतर दोन साथीदार त्या ठिकाणी आले. त्यांनी विद्यार्थ्याला जिवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देत दुचाकीवर बसवून गोरड हॉस्पिटलजवळ उसाच्या शेतात नेले. त्या ठिकाणी त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला. चोरट्यांनी विद्यार्थ्याला विवस्त्र करून त्याचा व्हिडिओ बनवला. हा व्हि़डिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन रात्री साडेआठच्या सुमारास एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये नेले. त्या ठिकाणी विद्यार्थ्याला धमकावून डेबिट कार्डचा पासवर्ड घेऊन 14 हजार 500 रुपये काढून घेऊन चोरटे पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (SDPO Ganesh Ingle) यांनी घटनास्थळी भेट दिली.
बारामती तालुका पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी एटीएम सेंटर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Nude video taken after robbing medical student; Sensational incident in Baramati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा