Pune Crime | न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार; फोटो डिलिट करण्यासाठी मागितली 1.70 लाख रुपयांची खंडणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | इंस्ट्राग्रामवर (Instagram) मैत्री करुन त्यातून प्रेमसंबंध निर्माण करुन एका अल्पवयीन मुलीला फसवून तिचे न्यूड फोटो पाठविण्यास सांगितले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर फोटो डिलिट करायचे असेल तर 1 लाख 70 हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी (Marketyard Police Station) सुयश दत्तात्रय पानसरे Suyash Dattatraya Pansare (वय २१, रा. गंगाधाम सोसायटी, मार्केटयार्ड) याच्याविरुद्ध ३७६, ३८५, ३२३, ५०४, ५०६/२ सह पोक्सो अ‍ॅक्टखाली (pocso act) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याप्रकरणी एका तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी अल्पवयीन असताना तिच्यासोबत २०१६ मध्ये मैत्री केली. नंतर प्रेमसंबंध निर्माण करुन इंस्ट्राग्रामवर न्यूड फोटो पाठवण्यास सांगितले. प्रेमात बुडालेल्या या अल्पवयीन मुलीने त्याला आपले न्यूड फोटो पाठविले. त्यानंतर २०१९ मध्ये फिर्यादीचे आईवडिल घरी नसताना सुयश घरी आला. त्याने हे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली व तिच्यावर बलात्कार (Rape) केला. त्यानंतर आता त्याने तुझे फोटो डिलिट करायचे असेल तर १ लाख ७० हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर फोटो व्हायरल करुन तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी (Pune Crime) दिली. त्यामुळे या तरुणीने घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक ढमढेरे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | objectionable photos threatened to go viral! Rape of a minor girl; Ransom of Rs 1.70 lakh demanded for deleting photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Cruise Drugs Case | ‘ही तुमची शूटिंग किंवा प्रोडक्शन हाऊस नाही’; चौकशीसाठी उशिरा आलेल्या अनन्या पांडेला समीर वानखेडेंनी सुनावलं

Life Certificate | पेन्शनधारकांनो, लवकर जमा करा ‘हयाती’चा दाखला, अन्यथा बंद होईल ‘पेन्शन’; जाणून घ्या शेवटची तारीख आणि प्रोसेस?

Pune Crime | पुण्यातील सिंहगड रोडवर चौथ्या मजल्यावरुन उडी मारून 26 वर्षीय महिलेची आत्महत्या; प्रचंड खळबळ