Pune Crime | कोल्हापूरच्या 26 वर्षीय तरुणीला अश्लिल मेसेज ! खडकी पोलिसांकडून वाकडमधील जीम ट्रेनर गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जीममध्ये ट्रेनिंग (Gym Training) घेण्यासाठी आलेल्या तरुणीला वारंवार अश्लिल मेसेज पाठवून तिचा पाठलाग करुन धमकाविणार्‍या वाकडमधील (Wakad) जीम ट्रेनरला (Gym Trainer) खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) चांगलाच धडा शिकवला आहे. (Pune Crime)

खडकी पोलिसांनी अमित आनंद गायकवाड Amit Anand Gaikwad (वय ३४, रा. वाकड) या जीम ट्रेनरला अटक केली आहे. याप्रकरणी कोल्हापूर (Kolhapur News) येथील एका २६ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या खडकी (Khadki News) येथील जीममध्ये व्यायामासाठी डिसेंबर २०१६ मध्ये जात होत्या. यावेळी अमित गायकवाड हा त्यांचे जीमचे ट्रेनिंग घेत असे. या दरम्यान त्याने फिर्यादीचा मोबाईल नंबर घेऊन त्यावर इन्स्टाग्राम (Instagram) व फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून त्यांना वारंवार अश्लिल मेसेज पाठविले. फिर्यादी यांचा पाठलाग करुन त्यांना लग्न करण्याविषयी धमकी दिली. त्यानंतर त्या कोल्हापूर येथे रहायला गेल्या. तेथेही त्याने त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी अमित गायकवाडला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील (API Prema Patil) अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Obscene message to 26 year old girl from Kolhapur ! Gym trainer arrested in Wakad by Khadki police in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे, केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत; जाणून घ्या कमतरतेची लक्षणे